Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

बदोनी बनला धोनी, विराट कोहलीची स्टाईल कॉपी, पाहा व्हिडीओ

3 बॉलवरच बदोनीनं जिंकली चाहत्यांची मनं, धोनी आणि कोहलीची आली पुन्हा आठवण, नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

बदोनी बनला धोनी, विराट कोहलीची स्टाईल कॉपी, पाहा व्हिडीओ

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग समजली जाते. इथे नव्या खेळाडूंना संधी मिळते आणि त्यांची कामगिरी उत्तम असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावं खेळण्याची संधीही दिली जाते. लखनऊचा स्टार प्लेअर आयुष बदोनीची कामगिरी गेल्या 3 सामन्यात उत्तम राहिली आहे. 

3 सामन्यांमध्ये आयुष बदोनीनं एका उत्तम फिनिशरची भूमिका निभावली. त्याने टीमला जिंकवून दिलं. धोनीशी त्याची तुलना देखील केली जात आहे. धोनीसारखा लखनऊ टीमला एक उत्तम फिनिशर मिळाल्याची चर्चा आहे. याच आयुष बदोनीनं दिल्ली विरुद्धच्या सामन्यात एकाच वेळी दोन दिग्गज खेळाडूंची आठवण करून दिली. 

आयुष बदोनीनं षटकार ठोकला त्यावेळी धोनीची आठवण झाली. त्याच सोबत आयुष बदोनीनं सामना जिंकवून दिला. याचं सेलिब्रेशन करताना  22 वर्षांच्या आयुषने विराट कोहलीची स्टाईल कॉपी केली.

आयुष बदोनीनं स्वत:ची पाठ थोपटली. त्याने विराट कोहलीची स्टाईल कॉपी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या कृतीमुळे सगळ्यांना पुन्हा एकदा विराट कोहलीची दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्यात आठवण आली. 

Read More