Justin Langer Viral Video: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) यांच्यात एक रोमांचक सामना अलीकडेच झाला. या सामन्यात लखनौ संघाने घरच्या मैदानावर शानदार विजय मिळवला. या सामन्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अजूनही बघायला मिळत आहेत. पण सामन्यानंतरही असं काही घडलं ज्याची खूप चर्चा होत आहे. मात्र ही घटना एखाद्या खेळाडूशी नाही तर लखनौच्या प्रशिक्षकाशी संबंधित आहे.
खरतर, सामन्यानंतर एलएसजीचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी असे काही केले. जे खूप हसवेल.
लखनौ सुपरजायंट्स संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर सामन्यानंतर पत्रकार परिषदेत घेत होते. यावेळी ते बोलत असताना त्यांच्या टेबल वर ठेवलेल्या माईक आणि रेकॉर्ड करायला ठेवलेल्या फोनवर एक फोन आला. एका पत्रकाराचा तो फोन होता. त्या पत्रकाराच्या फोनवर एक कॉल आला. तो नंबर त्याच्या आईच्या नावावर सेव्ह होता. कॉल बघून लँगर म्हणाला – ही आई कोण आहे? आणि यावेळी कोणाची आई हाक मारत आहे? यानंतर कोचने मोबाईल कानाला लावला आणि म्हणाले - हॅलो आई, 12:08 वाजले आहेत, मी पत्रकार परिषदेत आहे. यावेळी त्याची ही विनोदी शैली बघून सगळेच दिलखुलास हसले.
A phone call in the middle of the press conference
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
Good news on Mayank Yadav's recovery
And the importance of National Cricket Academy (BCCI's COE)
#LSG Head Coach, Justin Langer, has a field day at the post-match press conference #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/JAolaa5GTo
इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने 12 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 204 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावाच करता आल्या.
एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान.
हे ही वाचा: "सगळ्यात मोठा फ्रॉड.." किंमत 27 कोटी पण खेळ 0 ,सामन्यात सलग फ्लॉप झाल्याने ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल
विल जॅक, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, दीपक चहर, विघ्नेश पुथूर.