Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

LSG vs SRH: मिशेल मार्शने ठोकला 500000 रुपयांचा सिक्स, बुलेट शॉटने नवी कोरी कार डॅमेज; Video Viral

LSG vs SRH Mitchell Marsh Six Video: IPL 2025 च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या ओपनर मिचेल मार्शने आपल्या तुफानी फटकेबाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली. लखनऊकडून खेळताना मिचेल मार्शने यंदाच्या हंगामातील आपलं पाचवं अर्धशतक झळकावलं.  

LSG vs SRH:  मिशेल मार्शने ठोकला 500000 रुपयांचा सिक्स, बुलेट शॉटने नवी कोरी कार डॅमेज; Video Viral

LSG vs SRH Mitchell Marsh Six Viral Video: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स हा सामना सोमवारी रंगला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना मिचेल मार्शने केवळ 39 चेंडूत 65 धावांची धडाकेबाज खेळी केली. 6 चौकार आणि 4 सिक्स ठोकत मिचेलने त्याची खेळी केली. पण यामधील एक सिक्स इतका जबरदस्त होता की त्याची किंमत तब्बल 5 लाख रुपये ठरली. होय एका सिक्सची किंमत लाखात गेली. मिचेल मार्शचा तो शॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कारवर सिक्स, थेट 5 लाखांचे बक्षीस!

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका सिक्सची किंमत पाच लाख रुपये कशी? तर त्याच झालं की घडले असे की, सामना सुरू असताना बाउंड्रीजवळ TATA कंपनीची एक ब्रँड न्यू कार (Tata Curvv) उभी होती. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शने ईशान मलिंगाच्या बॉलवर दमदार सिक्स मारला. हा फटका थेट त्या नव्या कारवर जाऊन आदळला. कारला फारसा मोठा नुकसान झालं नाही, फक्त डेंट बसला, पण तरीही त्याची किंमत 5 लाखांवर गेली. 

हे ही वाचा: आधीच 27 कोटीचा खर्च त्यात दिग्वेशला रोज होणारा दंड... राठी अन् अभिषेकचा मैदानातच राडा, Video पाहून चाहत्यांचा संताप

 

TATA कडून खास घोषणा

आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच TATA कंपनीने जाहीर केलं होतं की, सामना सुरू असताना जर एखाद्या फलंदाजाचा फटका थेट त्यांच्यावर असलेल्या गाडीत लागला, तर त्या फलंदाजाच्या नावावर 5 लाख रुपयांची रक्कम ग्रामीण क्रिकेट विकासासाठी (Rural Cricket Development) डोनेट केली जाईल. त्यामुळेच मिचेल मार्शच्या या सिक्सची जोरदार चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा: LSG vs SRH: जादू-मंतर की तंत्र-मंत्र? संजय गोयंका सामना सुरु असताना कोणासमोर वाकले? फोटो Viral

 

हे ही वाचा: विराटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! कोहली पुन्हा दिसू शकतो पांढऱ्या जर्सीत... मिळाली मोठी ऑफर

लखनऊचा डाव 205 धावांचा 

सामन्याबाबत बोलायचं झालं, तर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊकडून मिचेल मार्श आणि एडेन मार्करमने जबरदस्त सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 115 धावांची खेळी केली. दोघांनीही अर्धशतक झळकावलं. मिडल ऑर्डरमध्ये निकोलस पूरनने 45 धावांची महत्वाची खेळी करत लखनऊचा डाव 205 धावांपर्यंत नेला.

Read More