Lucknow Super Giants Pacer: गोलंदाजांच्या दुखापतींच्या समस्येशी झुंजत असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. संघाचा झंझावाती वेगवान गोलंदाज मयंक यादव ( Mayank Yadav) लवकरच संघात सामील होऊ शकणार आहे. लखनौ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी ही माहिती दिली आहे. मयंक यादव सध्या एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. तो सध्या संघाशी थेट संबंधित नाही पण एनसीएच्या नेटमध्ये तो गोलंदाजीचा सराव करत आहे.
लखनौ सुपरजायंट्स (LSG) मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मयंक यादवबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले "येत्या काही दिवसांत सर्व काही ठीक झाले तर तो लवकरच संघात सामील होऊ शकतो." हा तरुण वेगवान गोलंदाज बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 90 ते 95 टक्के क्षमतेने गोलंदाजी करत आहे आणि येत्या काही दिवसांत तो संघात परत येऊ शकतो.
हे ही वाचा: "सगळ्यात मोठा फ्रॉड.." किंमत 27 कोटी पण खेळ 0 ,सामन्यात सलग फ्लॉप झाल्याने ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल
लँगरने सांगितले की, मयंक खेळण्यास उत्सुक आहे. एनसीएने आमच्या गोलंदाजांसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आवेश खान आणि आकाश दीप यांना आमच्यासाठी फिट करून परत पाठवले. आता मयंकही लवकरच परतेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा: मुंबई इंडियनच्याच्या पराभवाची जबाबदारी कोणाची? हार्दिक पांड्याने कोणावर फोडलं खापर? जाणून घ्या
लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर दमदार विजय मिळवल्यानंतर, लँगरने मयंकच्यारिकवरीबद्दल लेटेस्ट माहिती दिली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत लँगरने सांगितले की, मयंक पूर्णपणे निरोगी आहे ही खरोखरच भारतीय क्रिकेट आणि आयपीएलसाठी खूप चांगली गोष्ट आहे. मी काल एनसीए (NCA) मध्ये त्याच्या गोलंदाजीचे काही व्हिडीओ पाहिले.