Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिकेटशिवाय या खेळातही धोनी तरबेज...

महेंद्र सिंह धोनीसाठी आयपीएल २०१८ ची सुरुवात जबरदस्त झाली. 

क्रिकेटशिवाय या खेळातही धोनी तरबेज...

मुंबई : महेंद्र सिंह धोनीसाठी आयपीएल २०१८ ची सुरुवात जबरदस्त झाली. धोनीच्या टीमने दोन सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. २ वर्षांच्या बॅननंतर त्याची टीम आयपीएलमध्ये परतली आहे. टीम चांगले प्रदर्शनही करत आहे. पण धोनी क्रिकेटशिवाय इतर खेळातही रुची दाखवत आहे.

यापेक्षा गन शूटिंग करणे अधिक मजेदार

आयपीएलमध्ये धोनीने आपल्या फॅन्सना त्याचे दुसरे रुपही दाखवले. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यात तो शूटिंग रेंजमध्ये निशाणा साधताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करताना धोनीने लिहिले की, अॅडच्या शूटिंगपेक्षा गन शूटिंग करणे अधिक मजेदार आहे.

अश्विनसोबत सामना

३० सेकंदाच्या या व्हिडिओत धोनीने १५ फायर केले आहेत आणि यातील काही फायर्स निशाण्यावर बसले आहेत. १५ एप्रिलला धोनीच्या टीम चेन्नईची मॅच पंजाबच्या टीमसोबत होती. यातील खास गोष्ट म्हणजे चेन्नई टीममध्ये धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळत असलेल्या अश्विनसोबत आता त्याचाशी सामना होणार आहे.

लेफ्टिनेंट कर्नल ही उपाधी बहाल

शूटिंगशिवाय धोनी फुटबॉलही खेळताना अनेकदा दिसतो. त्याच्या घोडेसवारी आणि बाईक राईडचे प्रेम तर सर्वश्रृत आहे. भारतीय सेनेने धोनीला लेफ्टिनेंट कर्नल ही उपाधी बहाल केली आहे. अलिकडेच त्याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 

Read More