Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धोनीला पत्नी 'माही' म्हणत नाही, तर या नावाने हाक मारते....चाहत्यांनाही आनंद

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा एक गंमतशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनीची पत्नी धोनीला काय नावाने हाक मारतेय

धोनीला पत्नी 'माही' म्हणत नाही, तर या नावाने हाक मारते....चाहत्यांनाही आनंद

मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा एक गंमतशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनीची पत्नी धोनीला काय नावाने हाक मारतेय, कौतुक करतेय, हे ऐकलं तर तुम्हालाही हसू येईल. धोनीच्या चाहत्यांना तर मनापासून आनंद होतोय. कारण धोनीची निवृत्ती आणि टीम इंडियातील समावेश यावर सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यापेक्षा ही चर्चा नक्कीच गंमतशीर आणि आनंद देणार आहे.

धोनीला त्याचे चाहते माही म्हणतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण एमएस धोनीची पत्नी धोनीला काय नावाने हाक मारते हे तुम्ही खालील व्हिडीओत पाहा. व्हिडीओत धोनीला एका वेगळ्या नावाने हाक मारल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

एका फाईव्हस्टार सारख्या दिसणाऱ्या हॉटेलमधून धोनी बाहेर येत असताना, धोनीच्या पत्नीने त्याला हाक मारली अगदी तो पायऱ्यांवरून उतरत रिसेप्शनजवळ येईपर्यंत साक्षी त्याला एका खास नावाने म्हणजे स्विटी...स्विटी अखेर क्यूटी म्हणत होती, तोपर्यंत हा व्हिडीओ साक्षीने रेकॉर्ड केला आहे.

Read More