Rohit Sharma Run 20 KMs Everyday: भारताचे माजी क्रिकेटपटू योगीराज सिंग यांना तुम्ही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यास काय कराल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना योगीराज सिंग यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना जपलं पाहिजे आणि पाठिंबा दिला पाहिजे असं मला वाटत असल्याने मी आधी ते काम करेन, असं म्हटलं आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू तरुवर कोहली यांच्या 'फाइंड अ वे' नावाच्या पॉडकास्टमध्ये योगीराज सिंग यांनी हे विधान केलं आहे.
अमर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे संघ टीकेचा धनी ठरला होता. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात घरच्या मैदानावर खेळताना भारताला न्यूझीलंड्च्या पाहुण्या संघाने 0-3 असा व्हाइटवॉश दिला. त्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली. भारताने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आपला दबदाब कायम ठेवला आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असली तरी कसोटीमधील भारताची कामगिरी चिंतेची बाब आहे. आता भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार असून 2007 नंतर भारताने इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर योगीराज सिंग यांनी आपल्याला भारतीय संघाचा प्रशिक्षक केलं तर आपण भारतीय संघाला सध्या असलेल्या खेळाडूंच्या जोरावरच कधीच पराभूत न करता येणारी टीम बनवू असं म्हटलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना जपलं पाहिजे असंही योगीराज यांनी म्हटलं आहे. विराट आणि रोहित यांनी रणजी सामने खेळले पाहिजे याची खबरदारी मी घेईन असंही म्हटलं आहे. "तुम्ही मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनवला तर मी याच खेळाडूंचा वापर करुन असा संघ तयार करेन की त्याला पराभूत करणं अशक्य असेल. त्यांच्यातील क्षमता कोण बाहेर काढणार? लोक कायम त्यांना संघाबाहेर फेकण्यासाठी तयार असतात. रोहित आणि विराटला वगळा अशी मागणी करतात, पण का वगळायचं त्यांना? त्यांचा सध्या बॅड पॅच सुरु आहे. मला त्यांना सांगायचं आहे की मी तुमच्यासोबत आहे," असं योगीराज यांनी म्हटलं आहे.
Captain Rohit Sharma running and working hard at the BKC in Mumbai today.
— Tanuj (@ImTanujSingh) January 15, 2025
pic.twitter.com/3OXIvDoHBj
"मी प्रशिक्षक झालो तर त्यांना तुम्ही रणजी खेळलं पाहिजे असं सांगेन किंवा रोहित शर्माला रोज 20 किलोमीटर धावायला लावेन. कोणीच हे करत नाही. हे खेळाडू खरे हिरे आहेत. त्यांना असं बाहेर काढणं योग्य नाही. मी वडिलांप्रमाणे त्यांनीच काळजी घेईल. मी कधीच युवराज आणि इतर खेळाडूंमध्ये भेदभाव केला नाही. मी धोनीबद्दलही कधी दुजाभाव केला नाही. मात्र जे चूक आहे ते चूक आहे," असंही योगीराज म्हणाले.