Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला मिळाले नवे प्रेम? IPL मॅचमधला 'या' व्यक्तीसोबतच Video Viral

Malaika Arora at RR vs CSK: IPL मॅचमध्ये मलायका अरोरा राजस्थान रॉयल्सच्या डगआउटमध्ये एका दिग्गज क्रिकेटरसोबत दिसली. यामुळे सोशल मीडियावर डेटिंगची अफवा पसरली आहे.   

अर्जुनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला मिळाले नवे प्रेम? IPL मॅचमधला 'या' व्यक्तीसोबतच Video Viral

Malaika Arora Seen In Dugout Of Rajasthan Royals: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या घटसफोटानंतर ती बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती. या दोघांचं आता ब्रेकअप झालं असून आता मालयकाला नवीन प्रेम मिळाल्याची चर्चा आहे.  इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 11 व्या सामन्यात मलायका राजस्थान रॉयल्सच्या डगआउटमध्ये दिसली. इंडियन प्रीमियर लीगला बॉलीवूडचा स्पर्श नसेल तर तो अपूर्ण वाटतो. दरवर्षी लीगच्याभव्य उद्घाटन समारंभाला अनेक बोलिव्हीयुडकर आणि अन्य प्रसिद्ध सेलिब्रिटीं हजेरी लावतात. याशिवाय, आयपीएलच्या सामन्यांदरम्यानही अनेकदा बॉलिवूड कलाकार आणि अभिनेत्री त्यांच्या आवडत्या संघाला सपोर्ट करण्यासाठी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात. इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 11 व्या सामन्यात असेच काहीसे पाहायला मिळाले. 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 11 व्या सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या मॅचमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोराही दिसली. मलायका राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत टीम डायरेक्टर कुमार संगकाराच्या शेजारी बसली होती. मलायका अरोरा टीव्हीवर दिसताच सोशल मीडिया यूजर्सही सक्रिय झाले. मलायका राजस्थान रॉयल्स संघाचे संचालक आणि माजी दिग्गज क्रिकेटर कुमार संगकारासोबत बोलतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ, फोटो  समोर येताच युजर्सनी सोशल मीडियावर डेटिंगच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा: धोनीची विकेट घेतल्यानंतर संदीप शर्माने कोणाला केला व्हिडीओ कॉल? Video Viral

 

 

हे ही वाचा: काम थांबलं नाही पाहिजे! राहुल द्रविडने व्हीलचेअरवर बसून केली खेळपट्टीची पाहणी, धोनीनेही घेतले दुखापतीचे अपडेट

मलायकाला मिळाले नवीन प्रेम?

नुकतेच मलायका अरोराचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेला अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाले होते. या आधी मलायका क्वचितच कधी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दिसली आहे. अशा परिस्थितीत, राजस्थान रॉयल्सच्या डगआउटमध्ये कुमार संगकारासोबत स्पॉट झाल्यानंतर, सोशल मीडियावर  त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा: विजेच्या वेगाने स्टंपिंग! 0.10 सेकंदांपेक्षा कमी वेळात फिल सॉल्टला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; बघा Viral Video

अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

दोघांच्या डेटिंगबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका अरोरा सध्या सिंगल आहे. अर्जुन कपूरच्या आधी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते, मात्र 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. 

Read More