Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

11 वर्षानंतर आयपीएलमध्ये वेगळी झाली ही जोडी

 आयपीएलने भारताच्या 2 सुपरस्टार खेळाडुंना अखेर वेगळं केलं आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकत्र खेळले आहे. 2008 मधील आयपीएल पासून 2017 पर्यंत ते सोबत खेळत होते. 

11 वर्षानंतर आयपीएलमध्ये वेगळी झाली ही जोडी

बंगळुरु : आयपीएलने भारताच्या 2 सुपरस्टार खेळाडुंना अखेर वेगळं केलं आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकत्र खेळले आहे. 2008 मधील आयपीएल पासून 2017 पर्यंत ते सोबत खेळत होते. 

कोण आहेत ते 2 खेळाडू?

आयपीएलच्या सीजन 11 मध्ये आता हे दोघे खेळाडू वेगवेगळे खेळणार आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण असतील ते 2 खेळाडू? तर ते आहेत रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे.

एकाच संघात

उथप्पा आणि पांडे यांनी 2008 पासून एकाच संघात क्रिकेट खेळली आहे. 2008 मध्ये दोघेही मुंबई इंडियंसकडून खेळत होते. 2009-10 मध्ये दोघेही मग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भाग होते. 2011 ते 2013 ते पुणे वारियर्स इंडियाकडून खेळले. 2014 ते 2017 ते कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होते.

आता कोणत्या संघात?

आता आयपीएल-11 मध्ये उथप्पा कोलकाताकडून तर मनीष पांडे हैदराबादमधून खेळणार आहे. मनीष पांडेला हैदराबादने 11 कोटींना खरेदी केलं आहे. उथप्पाला कोलकाताने 6.40 कोटींन खरेदी केलं आहे.

Read More