Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात

कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला. 

शानदार खेळीनंतर दुसऱ्या दिवशी मनीष पांडे अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात

मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू मनीष पांडे विवाहबंधनात अडकला आहे. ३० वर्षाच्या या खेळाडून आज लग्न केलं. दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत त्यांने विवाह केला. रविवारी रात्री सूरतमध्ये झालेल्या सामन्यात कर्नाटकने फायनलमध्ये तमिळनाडूचा १ रनने पराभव केला. सैयद मुश्ताक अली टी-२० टूर्नामेंटचा खिताब कर्नाटकने आपल्या नावे केला.

सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी जिंकल्यानंतर तो सरळ मुंबईला रवाना झाला. मंगळवारी त्याचं रिसेप्‍शन होणार आहे. ज्यामध्ये अनेक क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत.

fallbacks

बुधवारी लगेचच त्याला टीम इंडियासोबत जोडलं जायचं आहे. कारण ६ डिसेंबरला हैदराबादमध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडिज पहिला टी२० सामना होणार आहे. लग्नानंतर तो लगेचच टीम इंडियासोबत खेळण्यासाठी जाणार आहे. 

fallbacks

२६ वर्षाची आश्रिता शेट्टी दक्षिणात्य सिनेमामध्ये काम करते. आश्रिता शेट्टीने अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

fallbacks

मनीष पांडे सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने रविवारी तमिळनाडू विरुद्ध झालेल्या सामन्यात कर्नाटककडून ४५ बॉलमध्ये ६० रन केले.

fallbacks

fallbacks

Read More