Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2019: चलाख धोनी! कृणाल पांड्याचा मंकडिंगचा प्रयत्न फसला

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानात चेन्नईचा ३७ रननी पराभव केला.

IPL 2019: चलाख धोनी! कृणाल पांड्याचा मंकडिंगचा प्रयत्न फसला

मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानात चेन्नईचा ३७ रननी पराभव केला. याचबरोबर चेन्नईची यंदाच्या मोसमातल्या विजयी मालिकेला ब्रेक लागला. याआधीच्या तिन्ही मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला होता. चेन्नईला या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचा कर्णधार धोनीने पुन्हा एकदा त्याची चलाखी दाखवली.

मुंबईची बॉ़लिंग सुरु असताना धोनी नॉन स्ट्रायकर एन्डला उभा होता. यावेळी बॉलिंग करत असलेल्या कृणाल पांड्याने धोनीला मंकडिंग करून आऊट करण्याचा प्रयत्न केला. पण धोनीने त्याची बॅट क्रिजमध्येच ठेवली. कृणाल पांड्याला धोनीला चेतावनी द्यायची होती का कृणाल पांड्याच्या मनात काय चाललं आहे, हे धोनीला आधीच कळलं होतं, याबाबत मात्र काहीही स्पष्ट नाही.

पंजाबचा कर्णधार अश्विनने राजस्थानच्या जॉस बटलरला अशाच प्रकारे मंकडिंग करून आऊट केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अश्विनने खेळ भावना दुखावल्याचा आरोप काहींनी केला. तर अश्विनने क्रिकेटमधल्या नियमांचाच वापर केल्याचं सांगत अनेकांनी त्याला पाठिंबाही दिला होता.

Read More