Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

Manu Bhaker Raksha Bandhan Gift : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये दोन कांस्य पदक जिंकून देणारी मनू भाकर भारतात परतल्यावर तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. आज भारतात सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेला. मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे. मनूच्या भावाने दिलेलं गिफ्ट पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.  

भावाने मनूला दिलं हटके गिफ्ट : 

19 ऑगस्टला अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांच्या रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा देखील व्हिडीओ व्हायरल होत असून यात विनेशच्या भावाने तिला 500 रुपयांच्या नोटांचे बंडल दिले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या मनू भाकर हिने सुद्धा भावासोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचा फोटो शेअर केला. यात मनूचा भाऊ अखिल याने मनूला ओवाळणीत एक रुपयांची जुनी नोट दिली. मनूला भेट म्हणून मिळालेली एक रुपयांची न पाहून काही नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या.

आईने मनूला दिले जेवणाचे धडे : 

पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकर हिने आपण पुढील तीन महिने सुट्टी एन्जॉय करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हा मनू सध्या तिच्या कुटुंबासोबत असून ती रक्षाबंधनाच्या निमित्ताने किचनमध्ये जेवण बनवताना दिसून आली. तिने किचनमध्ये काम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून त्याला "छुट्टी का सही इस्तेमाल करते हुए मां की क्लासेस" असं कॅप्शन दिलं आहे. 

हेही वाचा : विनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही

 

विनेशला भावाकडून मिळालं नोटांच बंडल : 

पॅरिस ऑलिम्पिकवरून परतल्यावर विनेश तिच्या गावी बलाली येथे पोहोचली. दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या दिवशी तिने आपल्या भावाला राखी बांधली, परंतु भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिच्या भावाने ओवाळणीत तिला पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल दिलं. सोशल मीडियावर विनेश आणि तिच्या भावाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विनेशने म्हंटले, 'मी आता जवळपास 30 वर्षांची झाले. मात्र गेल्यावर्षी पर्यंत माझा भाऊ मला ओवाळणी म्हणून 500 रुपये देत होता. त्यानंतर सरळ नोटांचं बंडल... त्याने त्याच्या जीवनभराची सर्व कमाई मला दिली आहे',  असं म्हंटल्यावर विनेश आणि तिचा भाऊ दोन्ही हसायला लागले. 

Read More