Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लवकरच होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लवकरच होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

मुंबई : माजी जागतिक नंबर-1 टेनिस स्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मारिया शारापोव्हा हे टेनिस जगतातील एक मोठे नाव आहे आणि तिने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. मारिया शारापोव्हाने या पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना Good News दिली आहे.

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका बीचवर दिसत आहे. या फोटोमध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. खरे तर मारिया शारापोव्हा लवकरच आई होणार आहे.

fallbacks

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने लिहिले, 'अमूल्य सुरुवात!!! दोघांसाठी वाढदिवसाचा केक खाणे हे नेहमीच माझे वैशिष्ट्य राहिले आहे.

fallbacks

मारिया शारापोव्हाने तिच्या वाढदिवशी तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 19 एप्रिलला शारापोव्हाचा वाढदिवस आहे.

fallbacks

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) 2020 मध्ये टेनिस कोर्टमधून निवृत्ती जाहीर केली. शारापोव्हाने ५ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.

fallbacks

मारिया शारापोव्हाने (Maria Sharapova) डिसेंबर 2020 मध्ये ब्रिटिश करोडपती अलेक्झांडर गिल्केसशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, प्रिन्स हॅरीसोबत गिल्केसचे संबंध खूप चांगले आहेत. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या लग्नात ती पाहुणी म्हणून उपस्थित होती.

Read More