Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मयंक अग्रवालचा आणखी एक धमाका, विराट-पुजाराचंही अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही मयंक अग्रवालने शतकी खेळी केली आहे.

मयंक अग्रवालचा आणखी एक धमाका, विराट-पुजाराचंही अर्धशतक

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही मयंक अग्रवालने शतकी खेळी केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये मयंकने द्विशतक केलं होतं. मयंकबरोबरच चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीनेही अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर २७३/३ असा होता. दिवसाअखेरीस विराट कोहली नाबाद ६३ रनवर आणि अजिंक्य रहाणे नाबाद १८ रनवर खेळत आहे.

पुण्यामध्ये सुरु असलेल्या या टेस्ट मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये शतक करणारा रोहित शर्मा या मॅचमध्ये १४ रनवर आऊट झाला. भारताला सुरुवातीलाच रोहितच्या रुपात धक्का बसल्यानंतर मयंक अग्रवालने पुजाराबरोबर मोठी भागीदारी केली. पुजारा ५८ रन करुन आणि मयंक १०८ रनवर आऊट झाले.

दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही विकेट कगीसो रबाडाला मिळाल्या. विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला, त्यामुळे ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे.

Read More