दुबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPL २०२०चा पहिला सामना दुबईमध्ये रंगला. मुंबई इंडीयन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. सौरभ तिवारीच्या खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू आणि फॅफ ड्यु प्लेसिस हे दोन्ही अनुभवी खेळाडू यावेळी चेन्नईच्या विजयाचे मानकरी ठरले.
FIFTY!
— IndianPremierLeague () September 19, 2020
First 50 of #Dream11IPL comes up.@RayuduAmbati hits his 19th IPL half-century off 33 deliveries.#MIvCSK pic.twitter.com/fKB5DutNPU
रायुडूने यावेळी ४८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी केली. रायडू बाद झाल्यानंतर खेळाची संपूर्ण जबाबदारी फॅफने पेलली. फॅफने यावेळी अर्धशतक पूर्ण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार रोहीत शर्माच्या ओपनिंगने मुंबई इंडीयन्सची सुरुवात चांगली झाली पण चेन्नईच्या भेदक माऱ्यापुढे मुंबईच्या विकेट पडत गेल्या. २० ओव्हर अखेर मुंबई इंडीयन्सने चेन्नई सुपर किंग्ज समोर १६३ चे आव्हान उभे केले , चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.