Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement
LIVE NOW

IPL 2022 : मुंबई विरुद्ध दिल्ली आज पहिलाच सामना, कुठे पाहता येणार फ्री

मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्याचे सर्व अपडेट्स पाहा फ्री, लाईव्ह स्ट्रिमिंग पाहाण्यासाठी तुम्हाला वापरायची फक्त ही ट्रिक

IPL 2022 : मुंबई विरुद्ध दिल्ली आज पहिलाच सामना, कुठे पाहता येणार फ्री

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात कोलकाता संघाने चेन्नईला धूळ चारली आहे. दुसरा सामना दिल्ली विरुद्ध मुंबई होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मुंबई संघ मैदानात उतरणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

गेल्या 14 वर्षातला मुंबई रेकॉर्ड तोडणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. आजपर्यंत मुंबई संघ हंगामातील कधीच पहिला सामना जिंकू शकली नाही. हा रेकॉर्ड मुंबई संघ आज ब्रेक करणार की तो कायम ठेवणार याकडे मुंबईकरांचंही लक्ष आहे. हा सामना कधी कुठे होणार आणि तो कुठे पाहता येणार जाणून घेऊया

मुंबई विरुद्ध दिल्ली सामना आज दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. दुपारी 3 वाजता टॉस होईल. यंदाच्या हंगामातील दोन्ही संघांचा हा पहिला सामना असणार आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. 

हा सामना क्रिकेटप्रेमींना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे. तर मोबाईलवर ज्यांच्याकडे हॉटस्टार आहे ते मोबाईलवर पाहू शकणार आहेत. दोन्ही गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही Jio चा क्रिकेट अॅड ऑन पॅक घेऊ शकता. त्याद्वारे तुम्हाला आयपीएलचे सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. 

Jio Cricket Add-On Plan

जिओने  279 रुपयांचा एक प्लॅन आणला आहे. यामध्ये Disney+Hotstar Mobile सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तर 15 GB हायस्पीड डेटा देखील यासोबत मिळेल. या प्लॅनची वैधता तुमच्या मूळ प्लॅनच्या वैधतेएवढीच असणार आहे. हा अॅडऑन पॅक असणार आहे. 

Read More