Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स उघडणार विजयाचं खातं? KKR विरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या Playing 11

IPL 2025 : सोमवारी मुंबईचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात सामना पार पडणार आहे. तेव्हा होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपलं विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स उघडणार विजयाचं खातं? KKR विरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या Playing 11

IPL 2025 : आयपीएल 2025 मधील बारावा सामना हा सोमवार 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स यांनी नव्या सीजनमध्ये दोन सामने खेळले असून यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तर मुंबई इंडियन्सला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले असून ते अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी मुंबईचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआर यांच्यात सामना पार पडणार आहे. तेव्हा होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये आपलं विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

कसा आहे MI VS  KKR हेड टू हेड रेकॉर्ड?

मुंबई इडिअन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 34 सामने खेळवले गेले असून यापैकी 11 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स तर 23 सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी झाली आहे. तर दोघांमध्ये खेळलेल्या सामन्यात सर्वात जास्त स्कोअर केकेआरने 232 धावांचा केला होता. तर मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक स्कोअर 210 धावा असा आहे. वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत केकेआर आणि मुंबईमध्ये 11 वेळा सामने खेळवले गेले असून यात 9 वेळा मुंबईने तर 2 वेळा केकेआरने सामना जिंकला आहे. 

हेही वाचा : मुंबईच्या फॅन्सने वानखेडेच्या मैदानावर..; 'त्या' कृतीमुळे शाहरुखही थक्क! 'KKR च्या पराभवापेक्षा त्याला..'

 

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेईंग 11 :

रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथूर

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11 :

क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, सुनील नरेन, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

Read More