Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मायकेल वॉन, नासिर हुसेनसह 8 दिग्गज ठरली अपयशी; पण दिनेश कार्तिकने केलेले ते भाकीत ठरलं खरं

India vs England Test Series : हातातून निसटणार असं वाटत असताना भारतीय संघाने इंग्लंड विरोधातील कसोटी सामन्यातील शेवटची मॅच जिंकून मालिका बरोबरीत सोडवली. या कसोटी मालिकेतील 46 दिवसांच्या कसोटी मालिकेतील 25 दिवस संस्मरणीय बनवून क्रिकेटप्रेमींना आनंदाचे क्षण दिलेत.  

मायकेल वॉन, नासिर हुसेनसह 8 दिग्गज ठरली अपयशी; पण दिनेश कार्तिकने केलेले ते भाकीत ठरलं खरं

India vs England Test Series :  अँडरसन-तेंडुलकर मालिकेत मोहम्मद सिराजने कसोटीच्या शेवटच्या दिवशी कमालची खेळी करून भारताच्या हातातून निसलेला सामना जिंकून दिला.  या विजयासह भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली. पाचव्या दिवशी सकाळी मॅच हातातून गेली असं असतानाच मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीने भारतीयांना विजयाचा क्षण दिला. (Michael Vaughan Nasir Hussain failed But Dinesh Karthik prediction came true India vs England Test Series cricket news )

भारतीय संघाची शेवटच्या दिवशी कशी होती खेळी?

दोन्ही संघांनी संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी केली पण भारतीय संघाने शेवटच्या दिवशी अख्खा गेमच बदलून टाकला. इंग्लंडच्या पारड्यात विजय असताना भारतीय संघाने तो त्यांच्याकडून हिरवून घेतला. चौथ्या दिवसाच्या शेवटी विकेट घेऊन टीम इंडियाने पुनरागमन करत पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता होती. तर भारतीय संघाला जिंकण्यासाठी 4 विकेट्सची गरज होती. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी मिळून हे अशक्य काम शक्य करुन दाखवलं आहे. पण बर्मिंगहॅमनंतर ओव्हलमध्ये भारताने विजय मिळवला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. यावर कार्तिकने एक मजेदार पोस्ट शेअर करुन सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. 

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडियासाठी बरेच काही बोलले जात होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीने सर्वांना हादरवून टाकले. तेव्हापासून भारताचा दावा कमी दर्जाचा मानला जात होता. तरुणांनी सुसज्ज असलेल्या या संघावर कोणीही पैज लावू इच्छित नव्हते. मोठ्या दिग्गजांनीही इंग्लंडच्या बाजूने भाकित केले होते. माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने X वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये 11 दिग्गजांच्या भाकिताबद्दल त्याने सांगितलं आहे. त्यापैकी फक्त कार्तिकने केलेले भाकीत खरं ठरलं आहे. 

भारताला कोणी पाठिंबा दिला?

कार्तिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये, फक्त ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने भारताला पाठिंबा दिला. त्याने टीम इंडियाच्या विजयाची भविष्यवाणी केली. क्लार्कला विश्वास होता की शुभमन गिलची सेना 3 - 2 च्या फरकाने मालिका जिंकेल. पण असे घडले नाही आणि भारत या स्कोअरलाइनमध्ये थोडा मागे पडला.

कोणत्या 9 दिग्गजाने भारताला केला होता विरोध?

एकापाठोपाठ 9 दिग्गजांनी भारतीय संघाच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती. यामध्ये नासिर हुसेन, मायकेल वॉन, अ‍ॅलिस्टर कुक, डेल स्टेन, ग्रॅमी स्वान, आकाश चोप्रा, जोस बटलर, डेव्हिड लॉईड आणि फिल टफनेल यांचा समावेश होता.

कोणी काय भाकित केले होते?

  1. नासिर हुसेन: इंग्लंड 3 - 1 असा विजय मिळवेल.
  2. दिनेश कार्तिक: मालिका  2 - 2 अशी बरोबरीत सुटली.
  3. मायकेल वॉन: इंग्लंड  3 - 1 असा विजय मिळवेल.
  4. अ‍ॅलिस्टर कुक: इंग्लंड 3 - 1 असा विजय मिळवेल.
  5. डेल स्टेन: इंग्लंड  3 - 2 असा विजय मिळवेल.
  6. ग्रॅमी स्वान: इंग्लंड  4 - 1 असा विजय मिळवेल.
  7. आकाश चोप्रा: इंग्लंड  3 - 2 असा विजय मिळवेल.
  8. जोस बटलर: इंग्लंड  4 - 1 असा विजय मिळवेल.
  9. डेव्हिड लॉईड: इंग्लंड  4 - 0 असा विजय मिळवेल.
  10. फिलिप टफनेल: इंग्लंड  3 - 1 असा विजय मिळवेल.
  11. मायकेल क्लार्क: भारत 3 - 2असा विजय मिळवेल.
Read More