Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धमक्या, द्वेष आणि भीतीनं भरलेली रात्र...अंडरटेकरशी लग्न केल्यानंतर मिशेल मॅककूलचं आयुष्य बनले नरक, जाणून घ्या नक्की काय झालं

 Mccool and Undertaker: WWE हॉल ऑफ फेमर मिशेल मॅककुलने खुलासा केला की जेव्हा तिने अंडरटेकरशी लग्न केले तेव्हा तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.   

धमक्या, द्वेष आणि भीतीनं भरलेली रात्र...अंडरटेकरशी लग्न केल्यानंतर मिशेल मॅककूलचं आयुष्य बनले नरक, जाणून घ्या नक्की काय झालं

Michelle Mccool Reveals Death Threats: बाकीच्या क्षेत्राप्रमाणे WWE सुपरस्टार्सना अनेकदा चाहत्यांकडून टीका आणि द्वेष मिळतो. कधीकधी हे चाहते त्यांची मर्यादा ओलांडतात. WWE मधील लोकप्रिय सुपरस्टार आणि हॉल ऑफ फेमर मिशेल मॅककूलनं अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. अंडरटेकरशी लग्न केल्यावर तिला जीव मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. मिशेल आणि अंडरटेकरने 2010 मध्ये लग्न केलं. ही जोडी WWE विश्वात खूप चर्चेत होती. पण या लग्नानंतर मिशेलच्या आयुष्यात एक वेगळाच काळ सुरू झाला.  लोकांच्या द्वेषानं आणि ट्रोलिंगनं भरलेला काळ.

चाहत्यांचा गैरसमज आणि अतिरेक

WWE मध्ये हे नवीन नाही की चाहते आपल्या लाडक्या स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यात खूप गुंततात. पण कधी-कधी हे सगळं अतिरेकी होते. मिशेलनं सांगितलं की, काही चाहत्यांना खरंच वाटलं की ती "डेडमॅन" अंडरटेकरशी लग्न करणार आहे. ज्यामुळे तिला खूप द्वेष मिळाला. त्या लोकांनी मिशेलला टार्गेट केलं.  तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं, द्वेष असलेलं मेसेज पाठवले आणि इतकंच नाही तर तिला थेट जीव मारण्याच्या धमक्याही दिल्या.

"रात्री झोपही लागत नव्हती" – मिशेल

WWE च्या Six Feet Under with The Undertaker या पॉडकास्टमध्ये, मिशेल मॅककूल आणि शार्लेट फ्लेअर एकत्र गप्पा मारत होत्या. त्यावेळी मिशेलनं तिच्या खासगी आयुष्यातील या त्रासदायक अनुभवाची मोकळेपणाने कबुली दिली. तिनं म्हटलं, "लोकांना खरंच वाटायचं की मी अंडरटेकरला लग्नासाठी पळवून नेलं आहे. त्यामुळे ते माझ्यावर चिडलेले होते. ते माझा राग सोशल मीडियावर काढायचे. पण जेव्हा जीव मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या, तेव्हा मी खूप घाबरले होते ."

WWE मध्ये मिशेलचं दमदार पुनरागमन

अशा सगळ्या नकारात्मक गोष्टींनंतरही मिशेलनं हार मानली नाही. 2018 मध्ये तिनं विमेन्स रॉयल रंबलमधून WWE मध्ये परत येत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ही तिची तब्बल सात वर्षांनंतरची रिंगमधली पहिली उपस्थिती होती. त्यानंतर Evolution या खास विमेन्स इव्हेंटमध्येही तिनं भाग घेतला. तिच्या अनुभवानं आणि ताकदीनं WWE ला तिच्या योगदानाची नव्याने जाणीव झाली.

हॉल ऑफ फेममध्ये अंडरटेकरसह गौरव

WWE च्या COO ट्रिपल एचनं स्वत: मिशेल आणि अंडरटेकरला कळवलं की त्यांना लास वेगासमध्ये हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणार आहे. ही केवळ मिशेलसाठीच नाही, तर तिच्या कठीण प्रवासानंतर मिळालेली एक मोठी मान्यता होती. मिशेल मॅककूलचं आयुष्य हे केवळ रिंगमधील लढतीपुरतं मर्यादित नव्हतं. तिनं प्रत्यक्ष आयुष्यातही अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकून दाखवल्या.

Read More