Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

साडी नेसून मैदानात उतरली माजी कॅप्टन मिताली राज

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

साडी नेसून मैदानात उतरली माजी कॅप्टन मिताली राज

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची अनुभवी फलंदाज आणि माजी कॅप्टन मिताली राजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिताली चक्क साडी नेसून मैदानात उतरलेली दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ मितालीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की,'साडी बरंच काही बोलते आपल्यापेक्षा ही अधिक. साडी तुम्हाला कधीच फिट होण्यास सांगत नाही. साडी तुम्हाला वेगळं दिसायला भाग पाडते. या आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2020 वर हा नवा लूक शेअर केला आहे.'

या व्हिडिओला तीन लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 37 वर्षांची मितालीने गेल्यावर्षी टी-20 क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. मिताली आता महिला वन-डे टीम कॅप्टन आहे.  तिने 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2364 रन केले आहात. ज्यामध्ये 17 अर्धशतक केले आहेत. त्याचबरोबरच मितालीने 209 वन डे मॅचमध्ये 6888 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने 7 शतक आणि 53 अर्धशतक केलं आहे. मितालीने फक्त 10 टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्यामध्ये तिने 663 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. 

Read More