स्विडन : तुम्ही कधी ऐकलंय का? कामात व्यस्त असल्याने कोणी स्वतःच्या लग्नाला पोहोचू शकलेलं नाही. तुम्हाला वाटेल आता आम्ही एखाद्या सिनेमाची स्टोरी तुम्हाला सांगतोय. मात्र असं नाहीये, अशी घटना खरंच घडलीये. एका व्यक्तीने स्वतःच्या लग्नाच्या दिवशी न जाता भावाला त्याच्या जागी पाठवून दिलंय. असा पराक्रम मोहम्मद बुया तुरे (Mohamed Buya Turay) या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूने केला आहे.
मोहम्मद बुया तुरे हा सिएरा लिओनचा स्टार फुटबॉल खेळाडू आहे. आपल्या हनिमूनबाबतही त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला, जेव्हा आम्ही लीगचे विजेतेपद जिंकू तेव्हाच हनीमूनला जाऊ.
नुकतंच त्याची चिनी फुटबॉल टीमतून प्रसिद्ध स्वीडिश फुटबॉल क्लब मालमोमध्ये बदली झाली. त्यामुळेच फुटबॉल क्लबसोबत झालेल्या करारामुळे तो स्वत:च्या लग्नाला उपस्थित राहिला नाही.
I married my sweetheart, wife and my Best friend today!!! What an amazing human being!!! And What a blessing!!! Mrs SBT Suad Baydoun
— Mohamed Buya Turay (@turay_buya) July 31, 2022
I can’t wait to enjoy life with you together soboti . pic.twitter.com/nEw4siV0QF
सिएरा लिओनचा प्रसिद्ध खेळाडू मोहम्मद बुया तुरे हा स्वीडनमधील नव्या फुटबॉल टीमसोबत महत्त्वाचा करार करणार होता. अशा स्थितीत मोहम्मद बुया तुरे याने आपल्या भावाला त्याच्या लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरी पाठवले.
सुआन आणि मोहम्मद बुया तुरे यांचा विवाह 21 जुलै रोजी होता. या तारखेपूर्वी मोहम्मद स्वीडन सोडणार होता. जिथे त्याला माल्मो फुटबॉल क्लब (माल्मो एफएफ) सह करारावर स्वाक्षरी करावी लागली. त्याला लग्नाची तारीख पुढे ढकलायची नव्हती. त्यासाठी मोहम्मद बुया याने ही युक्ती आखली. त्याने लग्नाआधी त्याची भावी पत्नी सुआद बेदौनसोबत क्लिक करून ठेवला होता.
मोहम्मद बुया तुरे म्हणाला, 'माझ्या लग्नात मी नव्हतो कारण माल्मो फुटबॉल क्लबने मला लवकर बोलावलं होतं'.
मोहम्मद बुया तुरेने लग्नाच्या काही दिवसांपूर्वी त्याचे फोटो क्लिक केले होते. यामुळेही अनेकांचा गोंधळ उडाला. फुटबॉल लीगचे विजेतेपद जिंकलं तरच आपण हनीमूनला जाऊ, असा दावाही मोहम्मद बुया तुरे याने केला.