Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'ही घ्या तुमची प्लेट, मला नको तुमची बिर्याणी,' अन् मोहम्मद शमी रवी शास्त्रींवर संतापला, मॅचनंतर म्हणाला 'तुम्ही नेहमी...'

मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या आणि भारताने वँडरर्स स्टेडियमवर इतिहासातील दुसरा विजय मिळवला  

'ही घ्या तुमची प्लेट, मला नको तुमची बिर्याणी,' अन् मोहम्मद शमी रवी शास्त्रींवर संतापला, मॅचनंतर म्हणाला 'तुम्ही नेहमी...'

Mohammed Shami and Ravi Shastri: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारत अरुण यांनी मोहम्मद शमीबाबत एक किस्सा उघड केला आहे, ज्यामध्ये रागाच्या भरात त्याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरोधात विजय मिळवून दिला. 2018 मधील या सामन्यात मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमीच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारतीय संघाने चार दिवसांत सामना संपवला आणि 63 धावांनी विजय मिळवला. 

दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना होता. दक्षिण आफ्रिकेने आधीचे दोन्ही सामने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. जोहान्सबर्गमधील तिसरा सामनाही जिंकत दक्षिण आफ्रिका संघ भारताला व्हाइटवॉश देत इतिहास रचण्याच्या तयारीत होता. या सामन्यात त्यांना विजयासाठी 223 धावांची गरज होती. 

दुपारच्या लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेची अवस्थात 171 धावांवर 7 गडी बाद होती. सोनी स्पोर्टशी संवाद साधताना, रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीला मी प्लेट भरुन बिर्याणी खाताना पाहून काय घडलं होतं याचा खुलासा केला. 

"जोहान्सबर्ग मैदान आणि शेवटचा दिवस होता. या सामन्यात वातावरण चांगलंच तापलेलं होतं. त्यांना सामना जिंकण्यासाठी 240 धावांची गरज होती. शेवटच्या दिवशी त्यांना 100 धावा हव्या होत्या आणि आठ विकेट्स हातात होत्या. लंच टाईममध्ये मी शमीची प्लेट पाहिली तर त्यात बिर्याणीचा डोंगरच होता," असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.

भारतीय संघाचे माजी गोलंदाज प्रशिक्षक अरुण यांनी खुलासा केला की, रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीला इतक्या बिर्याणीने तुझी भूक मिटली का? असा प्रश्न विचारला. "रवी त्याच्यासमोर चालत गेला आणि विचारलं, तुझी भूक मिटली का?".

यानंतर चिडलेल्या मोहम्मद शमीने आपली बिर्याणीची प्लेट परत केली  आणि म्हणाला मला आता खायचं नाही. अरुण यांनी पुढे सांगितलं की, रवीने मला जर शमी रागावला असेल तर त्याला एकट्याला सोडून दे, तुला त्याच्याशी बोलायचं असेल तर सांग की विकेट घे म्हणून असा सल्ला दिला. "ही घ्या तुमची प्लेट. नको तुमची बिर्याणी, खड्ड्यात गेली तुमची बिर्याणी," असं मोहम्मद शमी म्हणाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं. 

अरुण यांनी सांगितलं की, "रवी माझ्याकडे आला आणि म्हणाला, तो (शमी) रागावला आहे, त्याला असंच सोडून द्या. जर त्याच्याशी काही बोलायचं असेल तर विकेट घेऊन दाखव म्हणावं. रागावणं वेगळी गोष्ट आहे, पण त्याचा गोलंदाजीत वापर करणं वेगळी बाब आहे".

'माझ्यावर नेहमी रागावत जा...'

अखेरच्या डावात मोहम्मद शमीने 5 विकेट घेतले. दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज 22 धावांवर बाद झाले. अखेर सामन्यानंतर अरुण यांनी मोहम्मद शमीला बिर्याणीची प्लेट दिली असता तो  हसला आणि तुम्ही माझ्यावर नेहमी रागावत जा असं म्हणाला. 

"खेळ संपल्यानंतर तो आला आणि अरुण यांनी जाऊ म्हटलं, बिर्याणी घे, आता हवी तेवढी खा. त्यावर तो म्हणाला, तुम्ही रागावात जा, मग सगळं काही ठीक होतं," असं रवी शास्त्रींनी सांगितलं.

तो विजय भारताचा वँडरर्स स्टेडियमवरील दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवरील एकूण तिसरा होता.

Read More