Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शमीची पत्नी हसीन जहावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप! प्रकरणात मुलीचेही नाव, मारहाणीचा Video समोर

Hasin Jahan Fight Viral Video: हसीन जहाँ आणि तिची मुलगी अर्शी जहाँचा त्यांच्या शेजाऱ्यांसोबत जमिनीच्या वादावरून भांडण झाल्यानंतर त्या दोघींवर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप करण्यात आला आहे.   

 शमीची पत्नी हसीन जहावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप! प्रकरणात मुलीचेही नाव, मारहाणीचा Video समोर

Mohammed Shami’s Estranged Wife Hasin Jahan: टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांची विभक्त पत्नी हसीन जहां पुन्हा एकदा वादात अडकली आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सूरी शहरात हसीन जहां आणि तिची मुलगी अर्शी जहां यांच्याविरोधात शेजाऱ्यांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणात दोघींवर खुनाच्या प्रयत्नासह इतर गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हसीन जहां आणि तिची मुलगी शेजाऱ्यांशी जोरदार भांडण करताना दिसत आहेत. या वादाचे कारण स्थानिक जमीन तंटा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोप आहे की, हसीन जहां वादग्रस्त जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा शेजारी डाळिया खातून यांनी याला विरोध केला, तेव्हा वाद वाढला आणि मारहाणीपर्यंत गेला.

दोघींवर गुन्हा दाखल

डाळिया खातून यांच्या तक्रारीनुसार, हसीन जहां आणि तिची मुलगी अर्शी यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर पोलीसांनी हसीन आणि अर्शीविरोधात खुनाचा प्रयत्न (BNS 126(2), 115(2), 117(2), 109, 351(3), 3(5)) या नव्या दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

अर्शी जहां कोण आहे?

अर्शी जहां ही हसीन जहांच्या पहिल्या लग्नातून झालेली मुलगी आहे. ती मोहम्मद शमीची मुलगी नाही. सध्या हसीन जहां बीरभूममध्ये आपल्या मुलींसोबत राहत आहे.

 

शमी आणि हसीन यांच्यातील वाद

हसीन जहां आणि मोहम्मद शमी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक आणि कायदेशीर वाद सुरू आहेत. दोघं वेगळं राहत असून अलीकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला आपल्या पत्नी आणि मुलीच्या देखभालीसाठी महिन्याला 4 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यातील 1.5 लाख रुपये हसीन जहांसाठी तर 2.5 लाख रुपये त्यांच्या मुली इरासाठी आहेत.

नवीन वादाने अडचणी वाढल्या

जमीन तंट्यामुळे हसीन जहांवर आता आणखी कायदेशीर संकट ओढावलं आहे. तिच्यावर आणि अर्शीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने हा वाद चिघळा आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, व्हायरल व्हिडीओ, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळी घडलेली सगळी माहिती तपासली जात आहे.
हसीन जहांच्या या नव्या वादाकडे सध्या सगळ्या लक्ष लागले आहे.

Read More