Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मोहम्मद शमीसोबत घटस्फोटानंतर वेगळ्याच अवतारात दिसली हसीन जहॉ! Photos Viral

Hasin Jahan holi Photos: मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहॉचे होळी सेलिब्रेशनचे फोटो सध्या व्हायरल होतायत.  

मोहम्मद शमीसोबत घटस्फोटानंतर वेगळ्याच अवतारात दिसली हसीन जहॉ! Photos Viral

Hasin Jahan holi Photos: टीम इंडियाचे काही क्रिकेटर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिले. हार्दिक पांड्या आणि नताशा, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यातील दुरावा आल्याचे वृत्त समाज माध्यमात वाऱ्यासारखे पसरले. यादरम्यान मोहम्मद शमी आणि हसीन जहॉ यांचे नातेदेखील एका टप्प्यावर येऊन थांबले. यानंतर मोहम्मद शमी खचून न जाता टीम इंडियासाठी आणखी मेहनत घेताना दिसला. दरम्यान त्याची एक्स पत्नी हसीन जहॉचे होळी सेलिब्रेशनचे फोटो सध्या व्हायरल होतायत.  या फोटोंवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रियादेखील येतायत.

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वैयक्तिक आयुष्य अडचणींनी भरलेले होते. हसीन जहाँ जिच्यावर तो प्रेमात पडला आणि 2014 मध्ये त्यांनी लग्न केले. ही तिच स्त्री होती जिच्यामुळे त्याला आत्महत्या करण्याचा विचारही करायला भाग पाडले. घटस्फोटानंतर दरमहा मोठी रक्कम मिळवणारी हसीन जहाँ तिच्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतेय. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 2012 च्या आयपीएल दरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हसीन जहाँला भेटला. त्यावेळी हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्समध्ये चीअरलीडर म्हणून काम करायची. शमीची ओळख झाली आणि दोघांमधील नाते पुढे सरकले ते थेट लग्नापर्यंत पोहोचले.

दोघांच्या नात्यात दुरावा

दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 6 जून 2014 रोजी दोघांनीही कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. शमीची पत्नी झाल्यानंतर, हसीन जहाँने चीअरलीडर आणि मॉडेल म्हणून तिचे करिअर सोडण्याचा निर्णय घेतला. 2015 मध्ये मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांना मुलगी झाली. भारतीय क्रिकेटपटूने आपल्या मुलीचे नाव आयरा ठेवले. मुलगी फक्त 3 वर्षांची असताना शमी आणि हसीनमधील नाते खूपच बिघडले. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचारासह इतर अनेक गंभीर आरोपांचा आरोप केला.

हसीन जहाँ सोशल मीडियावर सक्रीय

हसीन जहाँ सोशल मीडियावर तिच्या मुलीबद्दल सतत पोस्ट करत असते. ती मॉडेल आणि अभिनेत्री म्हणूनही काम करत आहे. घटस्फोटानंतर वेगळे आयुष्य जगणारी हसीन जहाँ होळीच्या दिवशी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करते.लग्नानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद शमीला अनेक वेळा कोर्टात जावे लागले. 2019 च्या विश्वचषकानंतर तो भारतात परतताच त्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अखेर न्यायालयात प्रकरण मिटल्यानंतर हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत वेगळी राहू लागली. फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर हसीन जहॉंला खूप ट्रोल करण्यात आलं. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये तिची मुलगी देखील दिसतेय. व्हिडिओमुळे लोक वेगवेगळ्या कमेंट्स करतायत.

हसीन जहाँचे गेल्या वर्षीचे होळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने तिच्या मित्रांसोबत साजरी केलेल्या होळीचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंसोबत काही व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत. फोटोंमध्ये त्याची मुलगी तिच्या आईसोबत नाचताना दिसतेय.

Read More