Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

...अन् मोहम्मद शमी भारतीय संघातील खेळाडूंपासून दूर जाऊन उभा राहिला, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) चार गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकण्याची कामगिरी केली आहे.    

...अन् मोहम्मद शमी भारतीय संघातील खेळाडूंपासून दूर जाऊन उभा राहिला, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) चार गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारताने संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. संपूर्ण मालिकेत फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी न करु शकलेल्या कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली. गेल्या दोन वर्षात भारतीय संघाने तीन आयसीसी स्पर्धांची अंतिम फेरी गाठल्याने क्रिकेटमधील नवा चॅम्पिअन म्हणून उभारी घेतली आहे. यादरम्यान भारतीय संघाने चॅम्पिअन्स ट्रॉफी मिळाल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओत मोहम्मद शमी स्टेजवर सेलिब्रेशन सुरु होताच बाजूला जाताना दिसत आहे. 

'उद्या भारताने नो बॉल, वाईड नको सांगितलं तर त्यालाही....,' वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू संतापला, 'ICC ने त्यांना आता....'

 

नेमकं काय झालं?

भारतीय खेळाडूंच्या हाती चॅम्पिअन्स ट्रॉफी सोपवल्यानंतर शॅम्पेन उडवत विजय साजरा करण्यात आला. दरम्यान शॅम्पेन उडवायला सुरुवात करण्याआधी मोहम्मद शमी मंचावरुन खाली गेला आणि तिथे उभं राहून सेलिब्रेशन पाहत राहिला. शॅम्पेन उडवणं बंद झाल्यानंतर तो पुन्हा एकदा संघासह येऊन उभा राहिला आणि सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. अनेकांनी धार्मिक कारणांमुळे मोहम्मद शमी बाजूला गेला असावा असा अंदाज लावला आहे. मोहम्मद शमीने चॅम्पिअन्स ट्रॉफीत एकूण 9 विकेट्स घेतले. 

2021-22 च्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडवर 4-0 असा विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने साजरा केलेल्या जल्लोषातही अशीच घटना घडल्याची आठवण काहींनी करून दिली. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू शॅम्पेनच्या बाटल्या उघडणार होते, तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सला उस्मान ख्वाजा या जल्लोषात सामील होऊ शकणार नाही असं लक्षात आलं. कमिन्सने लगेचच खेळाडूंना बाटल्या दूर ठेवण्यास सांगितले आणि ख्वाजाला त्याच्या सहकाऱ्यांमध्ये सामील होण्यास सांगितलं.

'संजना, अजिबात मजा आली नाही,' के एल राहुलने बुमराहच्या पत्नीला स्पष्टच सांगितलं, 'मला 200 वेळा...'

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये स्थान मिळवणाऱ्या पाच भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये शमीचा समावेश होता. यासह विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांनाही संघात समाविष्ट करण्यात आलं. पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध 5 विकेट्स घेतले होते. शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीसह भारताचा संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.

Read More