Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तिलाही निर्लज्ज बनवशील' मुलीचा फोटो पोस्ट करून Mohammed Shamiची पत्नी ट्रोल

पुन्हा एकदा मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीचा वाद चर्चेत 

'तिलाही निर्लज्ज बनवशील' मुलीचा फोटो पोस्ट करून Mohammed Shamiची पत्नी ट्रोल

मुंबई : भारतीय संघाचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) यांच्या वैवाहिक जीवनात झालेला वाद सगळ्यांच्याच लक्षात आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. अनेकदा युझर्स तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात. मात्र यावेळी हसीनने स्वतःचा नाही तर आपल्या मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामुळे ती नेटीझन्सच्या चांगल्याच निशाण्यावर आहे. 

हसीन जहांकडून मुलीचा व्हिडीओ पोस्ट 

हसीन जहाँने नुकताच तिच्या मुलीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून लोक खूप भडकले आहेत आणि त्यांनी या व्हिडीओवर अश्लील टिप्पण्या करायला सुरुवात केली आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये शमी आणि हसीनची मुलगी बाथटबमध्ये आंघोळ करत आहे. हे पाहून लोकांनी हसीनला सांगितले की, ती या मुलीला स्वतःसारखी निर्लज्ज बनवेल. याशिवाय, अनेकांनी त्यांच्या टिप्पण्यांमध्ये मोहम्मद शमीची आठवणही केली आहे.

fallbacks

fallbacks

याआधीही मुलीचा फोटो पोस्ट करून ट्रोल झाली होती हसीना 

हसीन जहाँने यापूर्वीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. खरं तर हा व्हिडिओ फक्त तिच्या मुलीचा होता. या व्हिडिओमध्ये ती डान्स स्टेप करताना दिसत आहे. सोशल मीडियावर युजर्स म्हणतात की हसीन जहाँ तिच्या मुलीसोबत काय करत आहे. एवढेच नाही तर लोकांनी त्याला आपल्या मुलीला हे सर्व शिकवल्याबद्दल खूप वाईट म्हटले. इन्स्टावरील लोकांनी हसीन जहाँला तिच्या मुलीला स्वतःसारखे बनवू नये असा सल्ला दिला आहे.

शमीसोबत झाला होता मोठा वाद

2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नी हसीन जहाँने हल्ला, बलात्कार, खुनाचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आयपीसीच्या कलम 498 ए (हुंडा छळ) आणि कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत शमीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर त्याचा भाऊ हसीद अहमदवर कलम 354 (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आतापर्यंत झाला नाही घटस्फोट 

मोहम्मद शमीशी झालेल्या वादामुळे हसीन जहाँ बऱ्याच काळापासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू आहे. अद्याप दोघांमध्ये घटस्फोट झालेला नाही.

Read More