Player of the match award to Mohammed Siraj: भारत आणि इंग्लड यांच्यात झालेली पाच टेस्टची मालिका चांगलीच गाजली. शेवटपर्यंत नक्की काय निकाल लागेल हे कोणीही सांगू शकलं नाही. ओव्हल टेस्टमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेऊन एकूण 9 बळी मिळवत त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या दमदार परफॉर्मन्ससाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. मात्र, सिराजने अवॉर्ड स्वीकारताना एक अनोखा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तो चर्चेत आला. त्याने फक्त मेडल स्वीकारलं आणि अन्य बक्षीसाचा भाग नाकारला. त्याने नक्की काय नाकारलं, त्यामागचं कारण काय होतं? चाल जाणून घेऊयात...
पारंपरिक पद्धतीनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्ड विजेत्या खेळाडूंना ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून एक मेडल आणि शॅम्पेनची बाटली देतो. मात्र सिराजने केवळ मेडल गळ्यात घातलं आणि शॅम्पेन स्वीकारणं टाळलं. त्याच्या या निर्णयामागे वैयक्तिक किंवा सामाजिक नाही, तर धार्मिक कारण आहे असं मानलं जात आहे.
हे ही वाचा: Mohammed Siraj: मोहम्मद सिराजच्या कामगिरीचं BCCIकडून कौतुक, 'एवढ्या' रक्कमेचे मिळणार अतिरिक्त बक्षीस
मोहम्मद सिराज मुस्लिम धर्माचं पालन करणारा खेळाडू आहे. इस्लाम धर्मात मद्यपान किंवा मद्य स्वीकारणं हराम मानलं जातं. त्यामुळे त्याने शॅम्पेनची बाटली स्वीकारणं टाळलं. याआधीही अनेक मुस्लिम खेळाडूंनी अशाच प्रकारे मद्य संबंधित पुरस्कारांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. सिराजचाही हा निर्णय त्याच्या श्रद्धा आणि मूल्यांशी सुसंगत होता.
हे ही वाचा: Team India Schedule: इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया कधी मैदानात परतणार? जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल
या सामन्याच्या शेवटच्या दिवशी, इंग्लंडच्या शेवटच्या चार विकेट्सपैकी तीन सिराजने घेतल्या. शेवटचा बळी म्हणजे गस अॅटकिंसनला क्लीन बोल्ड करत भारताला 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. यामुळे त्याने केवळ ‘मॅच विनर’च नव्हे, तर मालिकेतील टॉप परफॉर्मर म्हणूनही आपली छाप सोडली.
हे ही वाचा: Mohammed Siraj: 13 कोटींचं आलिशान बंगला, लक्झरी कार्सचा ताफा… ‘DSP’ साहेबांची Net Worth माहितेय का?
या मालिकेत भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलनेही चांगली कामगिरी करत ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. गिलने मात्र आपला पुरस्कार मेडलसह शॅम्पेनच्या बाटलीसह स्वीकारला, ज्यामुळे सिराजचा निर्णय आणखी चर्चेत आला.