Mohammed Siraj, IND vs SL : एखाद्याचा दिवस चांगला असला की काहीही होऊ शकतं, असं सर्वांची आस्था असते. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजासोबत घडला आहे. भारताचा फास्टर गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने श्रीलंकेविरुद्ध एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेत श्रीलंकाला मोठा धक्का दिला. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने श्रीलंकाला बॅकफूटवर पाठवलं. चौथ्या ओव्हरच्या सलग तीन बॉलवर सिराजने दोन गडी माघारी धाडले. त्यानंतर सिराजने कहरच केला. त्याच्य़ा चौथ्या ओव्हरचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मोहम्मद सिराजने एकाच ओव्हरमध्ये (Mohammed Siraj thriller 4th Over) चार गडी बाद केले आहे. पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा या चार प्रमुख फलंदाजांना सिराजने डगआऊटमध्ये पाठवलं. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला सदिरा समरविक्रमा एकही धाव न घेता तंबुत परतला. त्यानंतर श्रीलंकेचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू चारिथ असलंका हा देखील सिराजने योग्य टप्प्यात टिपला गेला.
#AsiaCup2023 #INDvSL #Siraj #AsianCup2023
— (@superking1816) September 17, 2023
This is appreciation post for Mohammad Siraj no Fans Will pass without liking this Post pic.twitter.com/rlOBzLDCFd
दरम्यान, अचूक टप्पा अन् परफेक्ट लाईन आणि लेन्थच्या आधारावर सिराजने टप्प्यात गोलंदाजी केली अन् श्रीलंकेचा कार्यक्रम केला. श्रीलंकेच्या प्रमुख फलंदाजांना मैदानात टिकता आलं नाही. सिराजने एकाच ओव्हरमध्ये कहर केल्याने फलंदाजांवरचा प्रेशर वाढत गेला. तर दुसरीकडे रोहित शर्माने सिराजचा अटॅक सुरूच ठेवला. पावसामुळे सामना 40 मिनिट उशिराने सुरू झाला होता. मात्र, बुमराह आणि सिराजच्या कामगिरीमुळे टीम इंडियाने मोठं यश मिळवलं आहे.
W 0 W W 4 W
— ICC (@ICC) September 17, 2023
What a crazy over by Mohammed Siraj
India are on top in the #AsiaCup2023 Final!
: https://t.co/iP9YDGKRjo pic.twitter.com/PiOcgjNjFN
आशिया कप फायनल- श्रीलंका प्लेइंग 11:
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.
आशिया कप फायनल- टीम इंडिया प्लेइंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.