Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

धक्कादायक! पाकिस्तानमध्ये 'या' हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापले गेले, कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

Pakistani Hindu Cricketer: पाकिस्तानमध्ये एका हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय दुःखद कारणांमुळे कापण्यात आले आहेत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.    

धक्कादायक! पाकिस्तानमध्ये 'या' हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापले गेले, कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल

पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  पाकिस्तानमध्ये एका हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय दुःखद कारणांमुळे कापण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक मोहिंदर कुमार  यांच्या दोन्ही पायांना डॉक्टरांनी कापलं आहे. ही घटना ऐकून क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहेते. 

का कापण्यात आले पाय?

कराचीतून आणि हाऊस बिल्डिंग फायनान्स कॉर्पोरेशनकडून खेळणारे मोहिंदर कुमार हे गेल्या काही काळापासून मधुमेहाने त्रस्त होते असे सांगण्यात येत आहे. त्यांचं आजार इतकं गंभीर स्वरूप घेत होतं की, दोन्ही पायांमध्ये गंभीर इन्फेक्शन झालं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की पाय कापल्याशिवाय त्यांचं प्राण वाचवणं शक्य नाही.  त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर हा कठीण निर्णय घ्यावा लागला. ते मधुमेहाचे रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ठसा उमटवणारा वेगवान गोलंदाज

मोहिंदर कुमार यांनी 1976 ते 1994 या काळात पाकिस्तानच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी 65 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 187 बळी घेतले. यामध्ये 10 वेळा एका डावात 5 विकेट आणि 4 वेळा सामन्यात 10 पेक्षा अधिक बळी घेण्याचं मोठं यशही त्यांनी मिळवलं होतं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी 53 सामन्यांत 64 विकेट घेतल्या आहेत.

प्रशिक्षणातही मोठं योगदान

राष्ट्रीय संघात स्थान मिळालं नसल्याचं दु:ख त्यांना असलं तरी त्यांनी क्रिकेटशी आपलं नातं कायम ठेवलं. निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं आणि अनेक नवोदित क्रिकेटपटूंना घडवलं. दानिश कनेरिया, मोहम्मद सामी, तनवीर अहमद आणि सोहेल खान यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंना त्यांनी कोचिंग दिलं आहे.

ही घटना केवळ वैयक्तिक वाईट घटना नाही, तर पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक क्रिकेटपटूंच्या स्थितीवरही प्रश्न निर्माण करणारी आहे. मोहिंदर कुमार यांच्या आरोग्यासाठी सगळ्यांनीच सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Read More