Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वयस्कर खेळाडूंच्या आधारावर चेन्नईची टीम जिंकणार आयपीएलची ट्रॉफी

चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये वापसी करत आहे.

वयस्कर खेळाडूंच्या आधारावर चेन्नईची टीम जिंकणार आयपीएलची ट्रॉफी

मुंबई : चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये वापसी करत आहे.

2 वेळा चॅम्पियन

चेन्नईच्या टीमने 2 वेळा फायनल जिंकली आहे. 2010 आणि 2011 मध्ये आयपीएलची चॅम्पियन असलेली चेन्नई टीम यंदा देखील आपलं नाव यंदाच्या ट्रॉफीवर कोरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण ज्या प्रकारे त्यांनी आपली टीम बनवली आहे त्यावरुन असे प्रश्न उपस्थित होताय की, काय वयस्कर खेळाडुंच्या आधारे चेन्नई आयपीएलची हा खिताब जिंकू शकेल.?

30 च्या वरचे खेळाडू

चेन्नईने लिलावात आतापर्यंत ज्या खेळाडूंना खरेदी केलं आहे. ते सर्व 30 वयाच्या वर आहेत. टीमचा कर्णधार जवळपास 37 वर्षांचा आहे. हरभजन सिंह 37 वर्षाचा, शेन वॉटसन 36 वर्षाचा, ड्वेन ब्रावो 34 वर्षाचा, फैफ डू प्लेसी 33 वर्षाचा, केदार जाधव 32 वर्षचा तर सुरेश रैना 31 वर्षाचा आहे.

कशी जिंकणार फायनल

चेन्नईचे अनेक खेळाडू हे 30 वयाच्या वर आहेत. तर 2 खेळाडू 35 च्या वर आहेत. एक खेळाडू 35 वर्षाचा आहे. त्यामुळे आता हे खेळाडू फायनलपर्यंत कसे मजल मारतात हे पाहावं लागणार आहे.

Read More