Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयपीएल खेळाडू, मालकांविषयी भाजप खासदाराची अशीही मागणी

 या लिलावातील संघाचे मालक आणि खेळाडूंवर जास्त कर आकारण्यात आला पाहिजे. खासदार बाबूल सुप्रियो यांनी याविषयी ट्विट केले आहे. 

आयपीएल खेळाडू, मालकांविषयी भाजप खासदाराची अशीही मागणी

मुंबई : आयपीएल संघ मालकांनी काही खेळाडुंना कोट्यवधी रुपयांच्या बोली लावून खरेदी केले आहे. यावर भाजपाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी एक मागणी केली आहे. 

बाबूल सुप्रियो यांनी म्हटलं आहे, या लिलावातील संघाचे मालक आणि खेळाडूंवर जास्त कर आकारण्यात आला पाहिजे. खासदार बाबूल सुप्रियो यांनी याविषयी ट्विट केले आहे. 

मोठ्या मोबदल्याच्या लायकीचे खेळाडू नाहीत- सुप्रियो

एवढेच नव्हे तर त्यांनी लिलावात कोट्यवधी रुपयांचा भाव मिळालेले अनेक खेळाडू, इतक्या मोठ्या मोबदल्याच्या लायकीचेही नाहीत, असे देखील बाबूल सु्प्रियो यांनी म्हटलं आहे. आयपीएलच्या अकराव्या सिझनच्या खेळाडुंच्या लिलाव प्रक्रियेला शनिवारी प्रारंभ झाला यानंतर बाबूल सुप्रियो यांनी हे ट्वीट केलं आहे.

श्रीमंतीचं हास्यास्पद प्रदर्शन- बाबूल सुप्रियो

या खेळाडूंपैकी अनेकजण इतक्या मोठ्या रकमांच्या लायकीचे नाहीत. अशा खेळाडूंवर आणि त्यांना खरेदी करणाऱ्यांवर मोठा कर आकारला जावा, असे मला वाटते. त्यामुळे देशात सुरू असलेल्या या श्रीमंतीच्या हास्यास्पद प्रदर्शनापासून काहीतरी लाभ होऊ शकेल, असे सुप्रियो यांनी म्हटलं आहे.

Read More