MS Dhoni Video Viral : सध्याच्या काळात आपल्या पतीने आपल्या पत्नीला घाबरणं एक सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहितीये का? सेलिब्रिटीज सुद्धा त्याला अपवाद नाहीत. सध्या भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एम एस धोनी त्याच्या मित्राला केक कापताना पत्नी विषयी सल्ला देताना दिसतोय.
एम एस धोनी आयपीएल संपल्यावर पुन्हा रांची येथील आपल्या घरी राहतोय. येथे तो कधी बाईक रायडींग तर कधी शेती करताना दिसतो. एम एस धोनी काल रात्री मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या घरी गेला. एम एस धोनी वाढदिवसानिमित्त टेनिस प्रशिक्षकाच्या घरी गेलेला दिसला, तो धोनीचा मित्र देखील आहे. केक कापताना धोनी त्याच्या मित्राच्या संपूर्ण कुटुंबासह साध्या पद्धतीने उभा राहुल सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेला दिसला. या व्हिडीओमध्ये धोनीचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला.
हेही वाचा : बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर BCCI अॅक्शन मोडमध्ये, बनवले 10 नवे नियम, उल्लंघन केल्यास मोठी कारवाई
टेनिस प्रशिक्षक सुरेंद्र हे त्याचे बालपणीचे मित्र आहेत. धोनी कितीही प्रसिद्ध झाला तरी तो आपल्या जुन्या मित्रांना नेहमी भेटत राहतो आणि त्यांना कधीही विसरत नाही. त्यामुळे धोनी सुरेंद्र यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Video of the day pic.twitter.com/2KctX6yWTg
June 22, 2025
एम एस धोनीच्या मित्राने वाढदिवसाचा केक कापला आणि तो आधी धोनीला भरवायला जात होता.. त्यावेळी धोनी म्हणाला की, 'आधी तो तुझ्या बायकोला खायला दे, तुला घरात राहायचंय, आम्ही निघून जाऊ'. या विनोदावर तिथे उभे असलेले सर्वजण हसू लागले.