Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

महेंद्रसिंग धोनीसह पंकज अडवाणीला 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर

विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनीसह पंकज अडवाणीला 'पद्मविभूषण' पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्द्ल क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि जागतिक बिलियर्ड्स पंकज अडवाणी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा एकूण ८५ जणांना पद्मसन्मान मिळाला आहे.

संगीतकार इलाई राजा, गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परमेश्वरन (साहित्य आणि शिक्षण) यांना पद्मविभूषण तर, क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी आणि बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी यांची पद्मभूषणसाठी निवड करण्यात आली आहे.

बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी तब्बल १८ वेळा जागतिक बिलियर्ड्स विजेता ठरला आहे. त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल सरकारने त्याला पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलाय. 

Read More