Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'मॅरिज काउन्सलर'च्या भूमिकेत MS Dhoni! लग्नाआधीच नवरदेवाला दिल्या खास टिप्स, हा Viral Video एकदा बघाच

MS Dhoni: एमएस धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका लग्न समारंभात पोहोचलेला दिसतो आहे. त्याने नवरदेवाला वैवाहिक जीवनासाठी टिप्स देखील दिल्या.

'मॅरिज काउन्सलर'च्या भूमिकेत MS Dhoni! लग्नाआधीच नवरदेवाला दिल्या खास टिप्स, हा Viral Video एकदा बघाच

MS Dhoni Marriage Counsellor: एमएस धोनी मैदानावर जितका शांत आणि संयमी, तितकाच तो मैदानाबाहेरही चर्चेचा विषय ठरत असतो. आता मात्र तो अलीकडे एका वेगळ्याच भूमिकेत दिसून आला आहे. मॅरिज काउन्सलर म्हणून तो नव्या भूमिकेत तेव्हा दिसला.  सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात तो लग्नसमारंभात वराला लग्नानंतरचं वास्तव सांगताना दिसतोय. त्याच्या मिश्कील शैलीनं तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. 

सगळ्या नवऱ्यांचं आयुष्य शेवटी सारखंच असतं

धोनी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाला होता आणि स्टेजवर नवविवाहित जोडप्यासोबत उभा राहून त्याने नावरदेवाशी मजेशीर संवाद साधला. तो म्हणाला, "काही लोकांना आगीतून चालायला आवडतं, आणि हा त्यातलाच एक आहे!" पुढे धोनीने मिश्कीलपणे सांगितलं की, "तू वर्ल्ड कप जिंकलास की नाही याचा काही फरक नाही... सगळ्या नवऱ्यांचं आयुष्य शेवटी सारखंच असतं!"

हे ही वाचा: 'त्याचं तर आधीच ...', ऋषभ पंतने चहल आणि आरजे महवशच्या नात्याबद्दल केला खुलासा, दोघांनी उरकला साखरपुडा?

 

"तुला वाटत असेल तुझी वेगळी आहे, पण..."

या संवादादरम्यान धोनीने उत्कर्षला उद्देशून स्पष्ट सांगितलं  "जर तुला वाटत असेल की तुझं आयुष्य वेगळं असेल, तर तू चुकीच्या कल्पनेत आहेस." यावर उत्कर्षनेही हसत हसत मान्य केलं की "हो, माझी वेगळी नाही!" आणि मग काय  उपस्थित सर्व मंडळींनी टाळ्यांच्या गजरात हास्याचा जल्लोष केला.

हे ही वाचा: करुण नायरची कारकीर्द संपली ? कॅमेऱ्यासमोर ओक्साबोक्शी रडताना दिसला क्रिकेटपटू, के.एल. राहुलने दिला आधार

 

धोनीच्या लग्नाला किती वर्ष झाली?

धोनीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर त्याने 2010 मध्ये साक्षी सिंहसोबत लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगी आहे जिचे नाव जीवा धोनी आहे. धोनी आणि साक्षीने यावर्षी 4 जुलैला त्यांच्या लग्नाचा 15 वा वाढदिवस साजरा केला.

 

हे ही वाचा: सारा तेंडुलकरने शेअर केली तिची खास DIY मॅचा प्रोटीन स्मूदी Recipe, सांगितला त्वचेला चमक देणारा आरोग्यदायी फॉर्म्युला!

 

CSKमध्ये अजूनही आहे धोनीचा ठसा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आता केवळ IPLमध्ये खेळतो. IPL 2025 मध्ये, ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत धोनी पुन्हा एकदा CSKचे नेतृत्व करताना दिसला होता. एकंदरीत, मैदानात शांत आणि मैदानाबाहेर मिश्कील, असा धोनीचा अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.

Read More