MS Dhoni Retirement: आयपीएल 2025 चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दमदार संघ, खेळाडू यासह आतापर्यंत या सिजनचे 12 सामने झाले आहेत. या काळात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 3 सामने खेळले आहेत. सीएसकेने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला होता. पण त्यानंतर मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर कोणाची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर तो चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची आहे. गेल्या दोन सामन्यांत तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. या कारणामुळे त्याच्यावर खूप टीका होत आहे आणि काही लोक त्याला निवृत्तीचा सल्ला देत आहेत. तर यंदा तो निवृत्ती घेईलच अशीही चर्चा आहे.
धोनी गेल्या तीन सिजनमध्ये सतत खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. पण धोनीने क्रमवारीत बदल केल्यास CSK ची कामगिरी सुधारू शकते असे चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. अनेक चाहत्यांनी धोनीला आधीच्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी बोलावले आहे. आता असा अंदाज आहे की तो चेपॉक येथे 5 एप्रिल रोजी दिल्ली विरुद्ध चेन्नईच्या आगामी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल.
हे ही वाचा: शंका खरी ठरली! 'ही' सुंदरी चढली मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये, हार्दिकला नवीन प्रेम मिळालं?
एका रिपोर्टनुसार, धोनी मार्चमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा खेळाडू आहे. या बाबतीत तो विराट कोहली आणि रोहित शर्माच्याही पुढे आहे. धोनीनंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या चौथ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बनला दाक्षिणात्य चित्रपटात अभिनेता, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Most talked about Indian personalities in March on X:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2025
1. MS Dhoni.
2. Virat Kohli.
4. Rohit Sharma. pic.twitter.com/DKjGivgnD3
हे ही वाचा: MI vs KKR: ज्या वानखेडेवर उडवण्यात आलेली हार्दिकची खिल्ली तिथेच काल काय घडलं पाहा
मंगळवारी सोशल मीडियावर "एमएस धोनी निवृत्ती" ट्रेंडिंग सुरू झाल्यामुळे चर्चा वाढली. अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले की "थाला" ने अधिकृतपणे त्याच्या IPL कारकिर्दीला निरोप दिला आहे. याचे कारण असे की Instagram आणि X (पूर्वीचे Twitter) वर अनेक व्हायरल पोस्ट्सवरून असे दिसून आले आहे की त्याने तत्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. पण, लवकरच हे समजले कि ही पोस्ट एप्रिल फूलची पोस्ट आहे. आत्तापर्यंत, धोनी आयपीएल 2025 मध्ये एक सक्रिय खेळाडू आहे आणि चाहते संपूर्ण सीजन त्याला खेळताना बघू शकतात.
Ms dhoni broken inside nd now he take retirement from ipl @ChennaiIPL@msdhoni @Dhoni_Reenu07 pic.twitter.com/j2KuL511Fz
— JACK SPARROW (@explorer_nagrik) April 1, 2025
धोनी निवृत्ती होणार अशी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरु आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये, त्याने त्याला आणखी काही वर्षे खेळायचे आहे याचे संकेत दिले. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. CSK ने त्याला 4 कोटी रुपयांमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे.