Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MS Dhoni Daughter: बापानं सिक्स खेचताच लेकीचा चेहरा खुलला, Ziva चा आनंद गगनात मावेना; पाहा Video

CSK vs DC, IPL 2023:  खलीलच्या तिसऱ्या बॉलवर डीप मिड-विकेटच्या दिशेने धोनीने (MS Dhoni) भन्नाट पुल शॉट मारत षटकार खेचला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवानेही (Ziva Dhoni) आनंदाने उड्या मारल्या.

MS Dhoni Daughter: बापानं सिक्स खेचताच लेकीचा चेहरा खुलला, Ziva चा आनंद गगनात मावेना; पाहा Video

MS Dhoni Daughter, IPL 2023: श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी... लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी, या ओळीचा प्रत्यय आजच्या सामन्यात पहायला मिळाला. आयपीएल 2023 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) या दोन संघात खेळला गेला. यावेळी धोनीच्या चेन्नईने दिल्लीचा 27 धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ फक्त 140 धावाच करू शकला. धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीचं कौतूक तर होतंय. त्याचबरोबर धोनीची मुलगी झिवा (MS Dhoni Daughter Ziva) देखील चर्चेत राहिली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या संघाने 126 धावांवर आपले 6 विकेट गमावले  होते, त्यामुळे संघ अडचणीत आला. तेव्हा धोनी क्रीजवर उतरला आणि स्टेडियममध्ये धोनी-धोनीच्या घोषणा सुरू झाल्या. चेपॉकच्या मैदानावर धोनी हमखास खेळण्याचा प्रयत्न करतो. रवींद्र जडेजा क्रीजवर पाय़ रोवून होता. 18 व्या षटकात धोनी आणि जडेजाने 11 धावा करत अखेरीस फटकेबाजी करण्याचा बेत आखला.

आणखी वाचा - हा कसला कॅप्टन कूल? LIVE कॅमेऱ्यात MS Dhoni ने दीपक चाहरला केली मारहाण; पाहा Video

19 व्या ओव्हरमध्ये धोनीने आपलं फिनिशिंग रुप दाखवलं. धोनीने खलील अहमदविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. खलीलच्या तिसऱ्या बॉलवर डीप मिड-विकेटच्या दिशेने धोनीने भन्नाट पुल शॉट मारत षटकार खेचला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवानेही आनंदाने उड्या मारल्या. त्यावेळी धोनीच्या लेकीचा चेहरा आनंदाने खुलला होता.

पाहा Video -

दरम्यान,  महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने षटकार मारताच झिवा शिट्टी वाजवून जल्लोष करताना दिसली. मात्र, धोनी कॅच आऊट झाल्यावर तिचा चेहरा पडलेला देखील दिसून आला. सामन्यानंतर बापाला भेटण्यासाठी तिने दोन्ही हात फैलावर मैदानात उड्या मारू लागली आणि वडिलांच्या पायाला घट्ट माठी देखील मारल्याचं दिसून आलंय.

Read More