CSK VS RCB : आयपीएल 2025 मध्ये शनिवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK VS RCB) यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर 2 धावांनी विजय मिळवून या सीजनमधील 8 वा विजय नावावर केला. आयपीएल 2025 मध्ये यंदा एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे मैदानात अंपायरनी फलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूच्या बॅटची लांबी रुंदी तपासणं. 3 मे रोजी झालेल्या सामन्यात फिल्ड अंपायरने सीएसकेचा कर्णधार एम एस धोनीची बॅट चेक केली. मात्र या दरम्यान धोनीने जे केलं ते पाहून सर्वच थक्क झाले.
चेन्नई सुपरकिंग्सला आरसीबीने विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करत असताना चेन्नई सुपरकिंग्सच्या १७ व्या ओव्हरमध्ये लागोपाठ २ बॉलमध्ये २ विकेट गेल्या. त्यानंतर एम एस धोनीची मैदानात एंट्री झाली. यावेळी धोनीला दोन काम करायची होती, पहिले आरसीबीचा गोलंदाज लुंगी एनगिडी याची हॅट्रिक थांबवायची होती, तर दुसरीकडे आपल्या संघाला सुद्धा विजय मिळवून द्यायचा होता. एम एस धोनी जेव्हा क्रीजवर पोहोचला तेव्हा मैदानातील अंपायरनी त्याच्याकडे बॅट तपासायला मागितली. अंपायरने जेव्हा धोनीची बॅट तपासली तेव्हा ती बॅट ही गेजमधून पार झाली नाही आणि या टेस्टमध्ये फेल ठरली.
अंपायरनी धोनीची बॅट अवैध ठरवली. तेव्हा धोनीने स्वतः बॅट तपासण्याची गेज हातात घेतली आणि त्यातून आपली बॅट पास करून दाखवली. जे अंपायर करू शकले नाहीत ते धोनीने करून दाखवलं आणि हे पाहून अंपायर सुद्धा हसू लागले. मग धोनी मैदानात फलंदाजीसाठी उभा राहिला. चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नस्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या. चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी 214 धावांचे आव्हान दिले होते. परंतु ते हे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत आणि 2 धावांनी चेन्नईचा पराभव झाला.
IPL2025 IPL IPLonJioStar
PRADEEP CRICINFO (PradeepCricInfo) May 3, 2025
DHONI SAID - MY BAT IS FINEDhoni Jadeja ayushmhatre romarioshepherd romario RCBvsCSK CSKvsRCB Bhuvi Pathirana patidar ViratKohli ViratKohli MSD Kohli virat Chennai ChennaiSuperKings khaleel pic.twitter.com/Ask4r06EEb
सीसीआयने आयपीएलमधील बॅट्सचा आकार निश्चित केला आहे, त्यानुसार बॅटची रुंदी 4.25 इंच किंवा 10.8 सेमीपेक्षा जास्त नसावी. आयपीएलच्या नियमांनुसार, बॅटचा ब्लेड खालील परिमाणांपेक्षा जास्त नसावा त्याची रुंदी - 4.25 इंच /10.8 सेमी, खोली - 2.64 इंच /6 सेमी, एज - 1.56 इंच /4.0 सेमी. या व्यतिरिक्त, ती बॅट गेज (बॅटच्या आकाराचे मोजमाप करण्याचे साधन) मधून जाण्यास देखील सक्षम असावी.