Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

एम एस धोनीचं निवृत्तीबाबत मोठं विधान, गुजरातला पराभूत केल्यावर स्पष्टच बोलला

IPL 2025 : . सामन्याच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत सूचक वक्तव्य केलं, तसेच पुढच्या सीजनमध्ये ठो खेळणार की नाही याबाबत सुद्धा सांगितलं. 

एम एस धोनीचं निवृत्तीबाबत मोठं विधान, गुजरातला पराभूत केल्यावर स्पष्टच बोलला

IPL 2025 : आयपीएल 2025 चा 67 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातवर तब्बल 83 धावांनी विजय मिळवला. यासह आयपीएल 2025 मधील चेन्नईने त्यांचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केलाच तर यासह गुजरातला टॉपवर जाण्यापासून सुद्धा रोखलं. सामन्याच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत सूचक वक्तव्य केलं, तसेच पुढच्या सीजनमध्ये ठो खेळणार की नाही याबाबत सुद्धा सांगितलं. 

चेन्नईने दिलं 231 धावांचं आव्हान :

नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांनी लीग स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना खेळला. या सामन्याचा टॉस चेन्नईने जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी 5 विकेट गमावून 230 धावा केल्या. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 231 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात गुजरातला अपयश आलं आणि ते 147 धावांवर ऑल आऊट झाले. परिणामी चेन्नईने 83 धावांनी सामना जिंकला. 

काय म्हणाला एम एस धोनी?

एम एस धोनी आयपीएल 2026 मध्ये खेळणार का? याबाबत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हर्ष भोगलेशी बोलताना म्हणाला की, 'माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 4-5 महिने आहेत, त्यामुळे घाई नाही. शरीराला तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट असणे आवश्यक आहे. जर क्रिकेटर्स त्यांच्या कामगिरीवरून सेवानिवृत्त होण्यास सुरुवात करतील तर काही जण वयाच्या 22 वर्षीच निवृत्ती घेतील. मी रांचीला परत जाणार, काही बाईक आणि कार राईडचा आनंद घेईल. मी असं म्हणत नाहीये की माझं सगळं झालंय आणि असं देखील म्हणत नाहीये की मी पुन्हा येईन. माझ्याकडे वेळे आहे. त्याबद्दल विचार करेन आणि मग निर्णय घेईन. 

हेही वाचा  : IPLचा 16.5 कोटींचा पगार, BCCI चा करार आणि महागडी बॅट डील; किती आहे शुभमन गिलची Net Worth

चेन्नई सुपरकिंग्स प्लेईंग 11 :

आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद

गुजरात टायटन्स प्लेईंग 11 :

शुभमन गिल (कर्णधार ), जोस बटलर (विकेटकिपर ), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Read More