MS Dhoni CSK Captain again: एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे का? या प्रश्नाने धोनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नई संघ त्याच्या कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या फिटनेसबद्दल चिंतेत आहे. गायकवाडला आधी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना गायकवाडला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याने सरावही केला नाही. आता आज 5 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल, तर चेन्नईसाठी महेंद्रसिंग धोनी हा एकमेव पर्याय असेल, जो पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळू शकेल.
ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीत सुधारणा होत असली तरी तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, "ऋतुराज गायकवाड तो आज नेटमध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल, अशी आम्हाला आशा आहे. त्याच्या दुखापतीत सुधारणा होत असली तरी दुखापत अजूनही आहे. तो बरा होईल अशी आम्हाला खूप आशा आहे, मात्र अंतिम निर्णय सराव सत्रानंतर घेतला जाईल."
हे ही वाचा: मुंबई इंडियनच्याच्या पराभवाची जबाबदारी कोणाची? हार्दिक पांड्याने कोणावर फोडलं खापर? जाणून घ्या
ऋतुराज गायकवाड तंदुरुस्त नसेल तर चेन्नईकडे कर्णधारपदासाठी फारसे पर्याय नाहीत. अशा परिस्थितीत एमएस धोनी पुन्हा कर्णधार होणार हे जवळपास निश्चित आहे. याबद्दल बोलताना हसीने सांगितले की, "आम्ही यावर जास्त चर्चा केली नाही, पण आमच्याकडे एक युवा यष्टिरक्षक आहे ज्याला कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तो ही भूमिका करू शकतो. त्याने धोनीचे नाव घेतले नसले तरी त्याचे संकेत स्पष्ट होते."
हे ही वाचा: Dream 11 Co-founder Education: ड्रीम 11 सुरू करण्याची आयडिया देणारा भावित सेठ किती शिकला आहे?
सध्या सीएसकेला तीनपैकी केवळ एकच सामना जिंकता आला असून हा सामना संघासाठी खूप महत्त्वाचा असेल. धोनीने कर्णधारपद स्वीकारले तर चाहत्यांसाठी ते एखाद्या मोठ्या आश्चर्यापेक्षा कमी नसेल. चेपॉक स्टेडियममध्ये, प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या 'थाला' नेतृत्वाच्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळेल.