CSK vs DC: भारतीय संघाचा स्टार आणि माजी कर्णधार ज्याने देशासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिकवण्यास मदत केली तो म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, धोनी आता फक्त आयपीएल खेळतो. पण काही सिजन्सपासून आयपीएलमध्ये धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या येतात, पण तसे होत मात्र नाही. परंतु, शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात असे काही संकेत मिळत होते की, हा धोनीचा शेवटचा सामना असू शकतो. चेपॉक स्टेडियमवर दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील आयपीएल-2025 सामना खेळवला गेला. या सामन्यादरम्यान धोनीच्या आई-वडिलांना 12वे षटक सुरू होण्यापूर्वी दाखवण्यात आले. हे चित्र यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. थालाचे आई-वडील कधीही सामना बघायला स्टेडियमवर आलेले कधीही दिसले नाहीत. त्यामुळे धोनी आज शेवटचा आयपीएल सामना खेळतोय का? असे प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केले गेले.
वास्तविक, शनिवारी दुपारी, चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL 2025 चा 17 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचे आई-वडील आणि पत्नी साक्षी धोनी स्टेडियममध्ये उपस्थित होते. हे चित्र बघून चाहत्यांना असे वाटले की आजचा दिवस इतिहास रचणार आहे. थालाला खेळताना पाहण्याची बहुधा शेवटची वेळ आहे असे अनेकांना वाटले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच धोनीच्या निवृत्तीची बातमी वणव्यासारखी पसरली.
Dhoni's parents are here pic.twitter.com/ou90hU4oAS
— Kasi mama (@Kasi_mama_) April 5, 2025
यावर भर म्हणजे धोनीने एकदा सांगितले होते की तो त्याचा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईतील त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे कारण जर त्याने तसे केले नाही तर त्याच्यावर खूप प्रेम करणाऱ्या फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी ते चांगले होणार नाही. शनिवारचा सामना हा चेपॉक, चेन्नई येथे झाला होता.
हे ही वाचा: लखनौ सुपर जायंट्स संघाच्या प्रशिक्षकाला आला पत्रकाराच्या आईचा फोन, पत्रकार परिषदेचा Video पाहून येईल हसू
MS DHONI's PARENTS AT CHEPAUK pic.twitter.com/VyVEqZYS8b
— Johns. (@CricCrazyJohns) April 5, 2025
हे ही वाचा: IPL 2025: लखनौचा 21 वर्षीय दमदार वेगवान गोलंदाज परतणार, 150 च्या वेगाने करतो गोलंदाजी; तुम्ही ओळखू शकता का कोण आहे?
धोनीच्या निवृत्तीबद्दल धोनी किंवा फ्रँचायझीकडून निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही. तरीसुद्धा मैदानावर त्याच्या कुटुंबाची उपस्थिती आणि सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेल्या भावनिक झलकांनी चाहत्यांना संभ्रमात टाकले. लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत - "थाला, कृपया जाऊ नका!" आता धोनी स्वतः यावर काही वक्तव्य करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण एक मात्र नक्की की क्रिकेट चाहत्यांसाठी हा खूप भावनिक क्षण असेल आणि जर हा खरोखरच धोनीचा शेवटचा सीझन असेल तर इतिहास साक्ष देईल की 'थाला'सारखा कोणीच नाही.