Mumbai Cricket Association: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी आयपीएल सोडता करियरचा गेल्या काही काळ खूप चांगला गेला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने T-२० वर्ल्ड आणि चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. याशिवाय, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने 50 षटकांच्या विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने खेळले. एवढंच नाही तर रोहितच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स संघासाठी 5 आयपीएल जेतेपदेही जिंकली आहेत. अशा परिस्थितीत आता मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहितचा सन्मान एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा विद्यमान कसोटी कर्णधार रोहित शर्मासाठी एक खास गोष्ट करणार आहे असे सांगितले. रोहित शर्मा, माजी कर्णधार अजित वाडेकर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावार एक-एक स्टँडला नाव दिले जाणार आहे. एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा: CSK च्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने उडवली शिवम दुबेची खिल्ली, इंस्टाग्राम स्टोरी Viral
मंजूर झालेल्या ठरावानुसार, दिवेचा पॅव्हेलियनचा तिसरा मजला आता रोहित शर्मा स्टँड म्हणून ओळखला जाईल, ग्रँड स्टँडचा तिसरा मजला आयसीसीचे माजी अध्यक्ष पवार यांच्या नावावर असेल आणि ग्रँड स्टँडचा चौथा मजला वाडेकर यांच्या नावावर असेल.
हे ही वाचा: PM मोदींनी स्वत:च्या हाताने ज्या व्यक्तीला बूट घातले तो आहे तरी कोण? Video Viral
अजित वाडेकर हे क्रिकेट जगतातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. अजित यांनी 1966 ते 1974 या काळात 37 कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले. एवढच नाही तर 1971 मध्ये अजित यांनी भारताला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिले. ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी अजित वाडेकर यांचे निधन झाले.
हे ही वाचा: IPL 2025: DC vs MI सामन्यात तुफान हाणामारी! महिलेने केली तरुणाची धुलाई, Viral Video
2013 मध्ये कसोटी पदार्पण करणारा रोहित अनेक महान खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. आता रोहितला त्याच्या घरच्या वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावावर एक स्टँड होणार आहे. 2022 मध्ये कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, रोहितने 2024 मध्ये भारताला T-20 विश्वचषक आणि या वर्षी मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. या स्पर्धा जिंकणे फार महत्त्वपूर्ण गोष्ट होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता.