Papa Karkhanis: मुंबईचे माजी विकेटकीपर आणि रणजी खेळाडू विजय उर्फ 'पप्पा' कारखानीस यांचे 86व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 1960 च्या दशकात मुंबईकडून 7 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. शिवाजी पार्क जिमखाना आणि सेंट्रल बँक संघात त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ आपला खेळ दाखवला. ते सुनील गावसकर यांचे जवळचे मित्र होते. कारखानीस स्थानिक क्रिकेटमध्ये प्रसिद्ध शिवाजी पार्क जिमखाना आणि सेंट्रल बँकेकडून खेळले. जुन्या क्रिकेटपटूंच्या मते, ते एक धडाकेबाज फलंदाज आणि एक चांगले यष्टीरक्षक होते. रोहित शर्माच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात करखानीस यांची भूमिका मोलाची होती
भारतीय क्रिकेटसाठी रविवार (18 मे 2025) दु:खद ठरला. मुंबईचे माजी क्रिकेटपटू विजय 'पप्पा' कारखानीस यांचे बोरिवली येथील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करखानीस हे एक अनुभवी विकेटकीपर आणि जबरदस्त फलंदाज होते.
कारखानीस यांनी 1960 च्या दशकाच्या अखेरीस मुंबईकडून 7 रणजी सामने खेळले. याशिवाय त्यांनी शिवाजी पार्क जिमखाना आणि सेंट्रल बँक संघासाठीही 20 वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेट खेळले. मुंबई क्रिकेटपटूंच्या शर्यतीत ते महत्त्वाचे स्थान राखत होते. सुनील गावसकर यांच्याशी त्यांचेनटे अतूट होते.
त्यांनी 1967-68 च्या रणजी फायनलमध्ये मद्रासविरुद्ध 52 आणि 43 धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्या सामन्यात त्यांनी हरदिकर आणि एकनाथ सोलकरसोबत मुंबईला सलग दहावी रणजी ट्रॉफी मिळवून दिली.
रोहित शर्माच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात कारखानीस यांची भूमिका मोलाची होती. जेव्हा रोहित 14 वर्षांचा होता तेव्हा कारखानीस बोरिवलीतील एमसीए समर कॅम्पचे कोच होते, आणि त्यांनीच त्यातील टॅलेंट ओळखले होते.
2020 मध्ये कोविड संसर्गावर मात केल्यानंतरही ते काही काळ आजारी होते. पण त्यांचा आनंदी आणि प्रेरणादायक स्वभाव कायम आठवणीत राहील.