Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माऱ्यासमोर केकेआरचा डाव गडगडला

मुंबईने केकेआरवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माऱ्यासमोर केकेआरचा डाव गडगडला

दुबई : आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन संघ मैदानात आमने सामने आले.  नशिबाची साथ मिळाली म्हणून कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  परंतु मुंबई इंडियन्सच्या माऱ्यासमोर केकेआरचा डाव गडगडला. मुंबईपुढे विजयासाठी १४९ धावांचे आव्हान ठेवले होते. रोहित शर्मा आणि डीकॉक यांच्या खेळी पूढे केकेआर संघाला झुकावे लागले. या दोघांनी मुंबईला ९४ धावांची सलामी दिली

डीकॉकने यावेळी ४४ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. डीकॉकच्या जोरावर मुंबईने केकेआरवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

दरम्यान, सामन्यापूर्वी केकेआर संघात मोठा बदल करत आला. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश  कार्तिक कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी इऑन मॉर्गनकडे सोपवण्यात आली आहे. मला फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित करायचे असल्याचे कारण पुढे करत कार्तिकने कर्णधार पदावरून काढता पाय घेतला आहे. 

कार्तिक घेतलेल्या निर्णयानंतर देखील केकेआरला उत्तम कामगिरी बजावण्यात आली नाही .याआधीच्या एका सामन्यात देखील हे दोन संघ एकमेकांसमोर आले होते. तेव्हा मुंबईने ४९ धावांनी विजय मिळवला होता. २३ सप्टेंबरला या दोघांमध्ये पहिला सामना रंगला होता. आता देखील दुसऱ्यांदा मुंबई संघाने केकेआरवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

Read More