Jackie Shroff, Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या सिजनची लोक आतुरतेने वाट बघत असतात. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार संपल्यावर आता आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 हा सीजन 22 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सलामीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात रंगणार आहे. पण याआधीच मुंबई इंडियन्स (MI) टीमने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की, अभिनेता जॅकी श्रॉफ आता मुंबई संघाच्या खेळाडूंना कोच करणार आहे. मुंबई फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'दीर्घ श्वास घ्या आणि शांतता... कारण जग्गू दादा - तुमचे स्पिरिट प्रशिक्षक आले आहेत!'
हे ही वाचा: इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर 'रक्ताचा पाऊस', लाल झालेल्या समुद्राच्या लाटांचा Video Viral, काय आहे कारण?
व्हिडीओची सुरुवात फोन कॉलने होते. यामध्ये मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या 'हो भाऊ' म्हणतो... दुसऱ्या बाजूने जसप्रीत बुमराह विचारतो, 'कुठे आहे...', त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा येतात. टिळक विचारतात- कोणी नवीन येत आहे का? यानंतर माजी कर्णधार रोहित शर्मा आत येतो आणि तो रागाने विचारतो- आम्ही इतके दिवस वाट पाहत होतो, कुठे आहे तो? यानंतर जॅकी श्रॉफने प्रवेश केला आणि एकच खळबळ उडाली.
हे ही वाचा: "त्यांना क्रिकेटमधलं काही कळत नाही..." शाहिद आफ्रिदीने PCB चेअरमनचा जाहीरपणे केला अपमान!
हे ही वाचा: 'हा' आहे एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक, अश्विनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन सृजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिझाद विल्यम्स, विघ्नेश पुथूर