MI vs RCB IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सोमवारी एक जबरदस्त सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गेम-चेंजर ठरला तो शेवटी घेतला गेलेला जबरदस्त कॅच. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयात एमआयच्या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात घेतलेल्या एका जबरदस्त झेलची महत्त्वाची भूमिका ठरली. फिल सॉल्ट आणि टिम डेव्हिड या दोघांनी मिळून ही कॅच घेतली.
मुंबईला पाच चेंडूत 19 धावांची आवश्यकता असताना, क्षणभर असे वाटले की दीपक चहरने जोरदार षटकार मारला आहे. पण, आरसीबीला त्याचे विकेटमध्ये रूपांतर करण्यात यश आले. आरसीबीच्या फिल सॉल्ट आणि टिम डेव्हिड यांनी बॉण्ड्रीजवळ जबरदस्त टीमवर्क दाखवून एक जबरदस्त कॅच घेतला. या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सगळीकडे याच कॅचची चर्चा सुरु आहे.
हे ही वाचा: वडील टेलर, मुलगा सुपरस्टार! IPL 2025 मध्ये मोठ्या फलंदाजांना आउट करणारा झीशान अन्सारी आहे तरी कोण?
षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गोलंदाज कृणाल पंड्याने एमआयचा फलंदाज मिचेल सँटनरला बाद केल्याने, चहरवर मोठा फटका मारण्याचा दबाव आला. हे त्याच्याकडे बघून दिसत होते. चहर आपली पूर्ण ताकद लावून जोरदार शॉट मारला पण इंग्लंडचा खेळाडू फिल साल्ट चेंडू पकडण्यासाठी धावत आला. परंतु, चेंडू पकडताच साल्टचा तोल गेला. सॉल्टने डोकं लावून चेंडू टिम डेव्हिडकडे फेकला, जो फिल साल्टच्या मागे चेंडू घेण्यासाठी धावत आला होता. ज्या क्षणी फिल साल्टचा तोल गेला त्या क्षणी बॉण्ड्रीजवळ आलेल्या टिम डेव्हिडकडे चेंडू फेकला आणि त्यानेही तो पकडला. अशाप्रकारे एक जबरदस्त कॅच चाहत्यांना बघायला मिळाला.
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
Phil Salt & Tim David pulled off a game-changing blinder at the ropes!
Scorecard https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/gJxRuQGEyV
सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमांचक विजय नोंदवल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने त्याच्या गोलंदाजांचे कौतुक केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुर च्या संघाने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २० षटकांत २२२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्स २० षटकांत ९ गडी गमावून फक्त २०९ धावा करू शकले.