Mumbai Indians Retaintion List : आयपीएल 2025 (IPL 2025) पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून याकरता 31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. त्यानुसार मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2025 साठी 5 खेळाडूंना रिटेन केलं असून यात रोहित शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली.
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माला कर्णधारपदावरून पायउतार करून हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे रोहित शर्मा हा नाराज असल्याचं म्हंटलं जात होतं. तसेच त्याचे आणि फ्रेंचायझीचे संबंध सुद्धा पुरीसारखे राहिले नाहीत त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून यंदा रोहित शर्माला रिटेन केलं जाणार नाही अशी चर्चा होती, मात्र या चर्चेला पूर्णविराम देऊन मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी गुरुवारी एक स्टेटमेंट जाहीर केलं. त्यानुसार मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 साठी रोहित शर्माला रिटेन केलं आहे.
— Mumbai Indians (mipaltan) October 31, 2024
We have always believed that the strength of a family lies in its core and this belief has been reinforced during the course of recent events.
We are thrilled that the strong legacy of MI will be carried forward by Jasprit, Surya, Hardik, Rohit and… pic.twitter.com/2OsPnWKche
आयपीएल रिटेन्शनच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे 6 खेळाडू रिटेन करायचे होते. मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि रोहित या चौघांना रिटेन करेल हे जवळपास निश्चित होते. मात्र यातलं पाचवं आणि सहावं नाव कोणतं असेल याबाबत शंका होती. मात्र मुंबई इंडियन्सने स्टार बॅट्समन तिलक वर्मा याला दिग्गज खेळाडूंसोबत संघात रिटेन केलं आहे.
मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला 18 कोटींना रिटेन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बुमराह हा जगातील सर्वात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. मुंबईने बुमराहनंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला 16.35 कोटी देऊन रिटेन केले. तर रोहित शर्मासाठी 16.30 कोटी तर तिलक वर्मासाठी 8 कोटी मोजले आहेत. 6 पैकी 5 खेळाडूंना रिटेन करून मुंबई इंडियन्सने RTM कार्ड राखून ठेवलं आहे.