Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

MI vs DC निर्णायक सामन्यापूर्वी कार्तिकचे ट्विट का होतेय व्हायरल ? असं काय लिहलय ट्विटमध्ये

आयपीएल 2022 मध्ये आज 69 वा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

MI vs DC निर्णायक सामन्यापूर्वी कार्तिकचे ट्विट का होतेय व्हायरल ? असं काय लिहलय ट्विटमध्ये

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये आज 69 वा सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू दिनेश कार्तिकने ट्विट केले आहे. त्याच्या या ट्विटची सोशल मीडियावर रंगलीय. नेमकी ही चर्चा का रंगलीय ती पाहूयात.  

 मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याच आजचा हा सामना खेळवला जाणार आहे. जर हा सामना दिल्लीने जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. आणि जर मुंबईने या सामन्यात पंतच्या संघाला हरवल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे.  दरम्यान आतापर्यंत गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

ट्विटमध्ये काय ? 
MI vs DC या सामन्यावर आरसीबीच्या संपूर्ण संघाच्या नजरा लागल्यात. याचाच एक भाग म्हणून बंगळुरूचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने ट्विट केले आहे. कार्तिकने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेला दिसतोय.

 आज मुंबईला आरसीबीचा पूर्ण पाठिंबा असल्याचं कार्तिकच्या या पोस्टमधून स्पष्ट होते. हे ट्विट या सामन्यापूर्वी खूप चर्चेत आले आहे.  हा फोटो पोस्ट करत कार्तिकने लिहिले, "Found this from Archives" कार्तिकचे हे ट्विट काही तासांतच व्हायरल झाले. या ट्विटला जवळपास अनेक वेळा रिट्विट आणि लाईक केले आहे.

Read More