Suryakumar Yadav New House Price : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने मुंबईत दोन अलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत.211100000 एवढ्या किमतीला त्याने हे दोन फ्लॅट विकत घेतले आहेत. या फ्लॅटच्या व्यवहार करताना सूर्यकुमारने कोट्यावधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे. जाणून घेऊया सूर्यकुमार याने मुंबईत नेमक्या कोणत्या एरियात हे फ्लॅट खरेदी केले आहेत.
जबरदस्त खेळीमुळे सूर्यकुमार नेमहमीच फार्मात असतो. सूर्यकुमार भारतीय टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे. सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. अशातच सूर्यकुमार यादव घर खरेदीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव याने मुंबईत दोन नवीन घरे खरेदी केली आहेत. या घरांची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या घरांचे फोटो सूर्यकुमारने शेअर केलेले नाहीत.
एका बिझनेस वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देवी शाह शेट्टी यांनी मुंबईतील देवनार येथील गोदरेज स्काय टेरेस येथे दोन नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. तब्बल 4222.76 चौरस फूट म्हणजेच जवळपास साडे चार हजार चौरस फूटाचे हे अलिशान फ्लॅट आहेत.
रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव याने तबब्ल 21.11 कोटी रुपयांना हे दोन फ्लॅट विकत घेतले आहेत. यासाठी सूर्यकुमारमने 1.26 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटीही भरली आहे. यावरून सूर्यकुमार यादव यांचे हे आलिशान घर किती सुंदर आणि मोठे असेल याचा अंदाज लावता येतो. सूर्यकुमारने घराचे फोटो अद्याप सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.
आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. सूर्यकुमार यादव याचा फॉर्म काहीसा खराब आहे, मात्र, आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी करू शकतो. यानंतर, टीम इंडिया अनेक महत्त्वाच्या टी-20 मालिका खेळण्याची तयार करत आहे. वर्षाच्या अखेरीस, भारतीय संघ आशिया कप स्पर्धा देखील खेळणार आहे. यामुळे सूर्यकुमार याच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.