Padmakar Shivalkar Passes Away: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना आज, 4 मार्च रोजी खेळाला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत. परंतु या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे भारतीय क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. मुंबईचा महान फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांचे आकस्मिक निधन झाले.
पद्माकर शिवलकर यांचे वयाच्या कारणास्तव निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. पद्माक शिवलकर हे भारतासाठी कधीही न खेळलेल्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक होते. 1961-62 आणि 1987-88 दरम्यान एकूण 124 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. 19.69 च्या सरासरीने पद्माकर शिवलकर यांनी 589 विकेट्स घेतल्या होत्या. या डावखुरा फिरकीपटूने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते आणि ते वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत खेळत राहिले.
हे ही वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आली वाईट बातमी, 'या' दिग्गज फलंदाजाचा झाला आकस्मिक मृत्यू; चाहत्यांना धक्का
पद्माकर शिवलकर यांनी भारताच्या प्रमुख देशांतर्गत स्पर्धेत 361 विकेट घेतल्या आहेत. ज्यामध्ये 11 वेळा एका सामन्यात 10 विकेट्स त्यांनी घेतल्या आहेत. त्याने 12 लिस्ट ए सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2017 मध्ये सीके नायडू 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्काराने त्यांचा गौरव केला.
हे ही वाचा: "भारत तुम्हाला पगार देत आहे...", सुनील गावस्कर अचानक संतापले, वक्तव्याने उडाली खळबळ
Really sad to hear about the demise of Paddy Shivalkar. A wonderful, kind hearted man, a terrific bowler and a big inspiration in the early days of my career. Condolences to the family and God bless his soul
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) March 3, 2025
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, " मुंबई क्रिकेटने आज एक खरा दिग्गज गमावला आहे. पद्माकर शिवलकर सरांचे खेळातील योगदान, विशेषत: सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. मुंबई क्रिकेटवर त्याचे समर्पण, कौशल्य आणि प्रभाव अतुलनीय आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.''
सुनील गावसकर यांनी लिहिले, " ही खरोखरच खूप दुःखद बातमी आहे. अल्पावधीतच, मुंबई क्रिकेटने आपले दोन दिग्गज खेळाडू, मिलिंद आणि आता पद्माकर यांना गमावले, जे अनेक विजयांचे शिल्पकार होते. भारताचा कर्णधार म्हणून माझ्यासाठी एकच खंत आहे की, मी निवडकर्त्यांना 'पॅडी'चा कसोटी संघात समावेश करण्यास राजी करू शकलो नाही.ते इंडिया कॅपसाठी अधिक पात्र होता. हे नशीब आहे."