Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने बुधवारी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता अजून एका स्टार क्रिकेटरने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून त्यांचा संघ बाहेर पडल्यावर निवृत्ती जाहीर केली आहे. बांगलादेशचा क्रिकेटर मुशफिकुर रहीम (Mushfiqur Rahim) याने वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. विकेटकिपर फलंदाज असलेल्या क्रिकेटरने या निर्णयाचे कारण 'काही आव्हानात्मक आठवडे' असल्याचे सांगितले, ज्यामुळे त्याला कळले की आता वनडे करिअरला पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे.
37 वर्षांचा मुशफिकुर रहीम याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली. त्याने लिहिले की आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक माईलस्टोन साध्य केले आणि ते मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःचे 100 टक्के दिले. मी आज वनडे फॉरमॅटमध्ये निवृत्तीची घोषणा करत आहे. पुढे त्याने लिहिले की, 'मी सर्वकाहीसाठी देवाचे आभार मानतो. आम्ही मिळवलेले यश आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी मर्यादित असले तरी एक गोष्ट खरी आहे की जेव्हाही मी माझ्या देशासाठी मैदानावर उतरलो तेव्हा मी संपूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने माझे १०० टक्के योगदान दिले. मागील काही आठवडे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. शेवटी मी माझे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे धन्यवाद मानतो ज्यांच्यासाठी मी 19 वर्ष क्रिकेट खेळतोय.
हेही वाचा : एम एस धोनी ते सचिन तेंडुलकर, 'या' दिग्गज क्रिकेटर्सना BCCI कडून किती पेन्शन मिळते?
After an ODI career spanning nearly two decades, Mushfiqur Rahim bids farewell to the format https://t.co/W02R3u6Rqj
— ICC (ICC) March 6, 2025
मुशफिकुने 274 सामन्यांमध्ये 7795 धावा करून बांगलादेशच्या वनडे इतिहासात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. यात 9 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी या धावा 36.42 च्या सरासरीने केल्या असून त्याच्या नावावर विकेटकिपर म्हणून 243 कॅच आणि 56 स्टंपिंग्स केल्या. मुशफिकुरने 2006 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच वर्षी त्याने बांगलादेशच्या अंडर 19 वर्ल्ड कप संघाचे नेतृत्व सुद्धा केले होते. त्यावेळी त्याने झिम्बाब्वे विरुद्ध अर्धशतक सुद्धा ठोकले. त्याच दुसरं अर्धशतक हे 2007 मध्ये कॅरेबियनमध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध झाले होते. ज्यात त्यांनी भारतावर विजय मिळवला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मुशफिकुर रहीमचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं. बांगलादेश हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए चा भाग होता. मात्र ग्रुप स्टेजमध्ये एकाही सामन्यात विजय न मिळवता बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडला. भारताविरुद्ध मुशफिकुर रहीम डकआउट झाला. तर न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात त्याने केवळ 2 धावा केल्या. तर पाकिस्तान विरुद्ध तिसरा ग्रुप स्टेज सामना हा पावसामुळे रद्द झाला.